२८ सप्टेंबर : १७७७ साली लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

  घटना.

  १७७७ : लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

  १९२४ : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

  १९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

  १९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  १९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  १९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

  १९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  १९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  २०००: नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.

  २००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.

  २००८: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.