उन्हाळ्यात घरच्या घरी मूग डाळीपासून तयार करा फेस स्क्रब, पिंपल्स होतील दूर

उन्हाळ्याच्या दिवसांना सध्या सगळीकडे सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हामुळे त्वचे संबंधित अनेक समस्या महिला आणि पुरुषांना जाणवू लागतात. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर चेहरा काळपट दिसू लागतो.

  उन्हाळ्याच्या दिवसांना सध्या सगळीकडे सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हामुळे त्वचे संबंधित अनेक समस्या महिला आणि पुरुषांना जाणवू लागतात. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर चेहरा काळपट दिसू लागतो. तसेच अनेकदा पिंपल्स, चिकटपणा आणि डाग यांसारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर आपण केमिकल युक्त काही प्रॉडक्ट बाजारातून विकत घेतो. मात्र त्याचा फायदा जास्त वेळ चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर घरगुती उपाय केल्याने बरेच फरक जाणवतात. जर तुम्ही चेहऱ्याच्या समस्यांना घेऊन त्रस्त असला तर तुम्ही घरच्या वापरातील मूग डाळ घेऊन फेस स्क्रब तयार करू शकता. हा फेस स्क्रब बनवण्यासाठी देखील सोपा आहे. चला तर जाणून घेऊया फेस स्क्रब कसा बनवतात.

  मूग डाळीचा वापर

  मूग डाळीचा वापर जेवणाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. मूग डाळ पचनासाठी देखील चांगली असते. अनेक लोक मुगाच्या डाळीची भाजी बनवतात. वरण, कोरड्या भाजी, खिचडी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी या डाळीचा वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित का मुगाची डाळ चेहऱ्याला पण लावता येते? मुगाच्या डाळीचा वापर चेहऱ्याला लावण्यासाठी देखील केला जातो. यामुळे चेहरा स्वच्छ आणि पिंपल्स मुक्त होतो. मुगाच्या डाळीमध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात.

  मूगच्या डाळीपासून फेस स्क्रब कसा बनवतात

  साहित्य:-

  मुगाची डाळ
  मध
  दही

  कृती:-

  तुम्ही घरच्या घरी मुगाच्या डाळीचा फेस स्क्रब बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एक रात्र पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर भिजवलेली डाळ मिक्सरमधून बारीक करा. त्यानंतर त्यात १ चमचा दही आणि अर्धा चमचा मध मिक्स करून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. १५ मिनिटानंतर हलक्या हाताने मसाज करून नंतर धुवून टाका. हे फेस स्क्रब आठवड्यातून दोनदा लावल्याने चेहऱ्याला अनेक फायदे होतात. चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.

  टीप:- ज्या व्यक्तींना मूग डाळीपासून ॲलर्जी असले अश्यानी हा फेस स्क्रब लावू नये. लाल रॅशेस, पिंपल्स किंवा ॲलर्जी आहे असे वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.