या पठ्ठ्याने कुंभकर्णाच्याही रेकॉर्डला दिलाय फाटा; १२ वर्षांपासून फक्त 30 minutes sleep हा माणूस, कारण वाचून तुमचीही झोप होईल गायब

दिवसातल्या फक्त ३० मिनिटेच झोपणाऱ्या जपानमधील या व्यक्तीचे नाव डाईसुके होरी (Daisuke Hori ) असे आहे. आपण आपली ८ तासांची झोप प्रयत्न करून ३० मिनिटांवर आणली आहे. या ३० मिनिटात योग्य प्रकारे झोप घेतल्याने ८ तासांची झोप पूर्ण होते. त्यामुळे त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

    प्रत्येक माणसाला निरोगी राहण्यासाठी दिवसभरात ८ ते ९ तासांच्या झोपेची (Sleep) नितांत आवश्यकता गरज असते. मात्र, जपानमधील (Japan) एका व्यक्तीने आपण दिवसातल्या २४ तासांपैकी फक्त ३० मिनिटेच (30 Minutes Sleep) झोपत असल्याचा दावा (Claim) केला आहे. गेल्या १२ वर्षांपासून (last 20 Years) आपण फक्त ३० मिनिटेच झोपत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या दाव्याची चर्चा होत आहे. तसेच या ३० मिनिटात आपली झोप पूर्ण होत असून आपल्याला थकवा, आळस किंवा अशक्तपणा वाटत नसल्याचेही त्याने सांगितले. या कमी झोपेमुळे आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही त्याने सांगितले (He also said that lack of sleep had no effect on his health). आपल्याला कामासाठी १६ तासही कमी पडत होते. त्यामुळे झोपेची वेळ कमी केल्याचे त्याने सांगितले.

    दिवसातल्या फक्त ३० मिनिटेच झोपणाऱ्या जपानमधील या व्यक्तीचे नाव डाईसुके होरी (Daisuke Hori ) असे आहे. आपण आपली ८ तासांची झोप प्रयत्न करून ३० मिनिटांवर आणली आहे. या ३० मिनिटात योग्य प्रकारे झोप घेतल्याने ८ तासांची झोप पूर्ण होते. त्यामुळे त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. योग्य प्रयत्न केल्यावर प्रत्येकजण आपल्या झोपेची वेळ कमी करू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. ‘डेली स्टार’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

    झोप कमी करण्याचे तंत्र सगळ्यांना शिकवण्यासाठी होरी यांनी “जपान शॉर्ट-स्लीपर असोशिएशन” (Japan short sleep association) स्थापन केली आहे. या संस्थेचे ते अध्यक्ष असून झोप करण्याचे तंत्र ते अनेकांना शिकवतात. आपला बहुमूल्य वेळ झोपेत वाया जातो. त्यावेळेचा सदुपयोग करून आपण उत्पादकता वाढवू शकतो. त्याचप्रमाणे स्वतःसाठीही आपण वेळ काढू शकतो, असे त्यांनी सांगितले. अनेकजण वेळ नसल्याचे कारण सांगतात. त्यांनी झोप कमी करण्याचे तंत्र आत्मसाद केल्यास त्यांना वेळेची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

    झोपेसाठी 8 तास देत उरलेल्या 16 तासात सर्व काम करणे शक्य नसल्याचे आपल्याला जाणवले. त्यामुळे ध्येय गाठण्यसाठी झोप करण्याचे आपण ठरवले. त्यासाठी योग्य तंत्राने टप्प्याटप्प्याने आपण आपली झोप कमी केली, असे होरी यांनी सांगितले. झोप कमी करून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होऊ न देता दिवसभर उत्साही राहून काम करणे शक्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

    आपल्या या दाव्यात तथ्य असून आपण फक्त 30 मिनिटेच झोपत असल्याच्या दाव्यात सत्यता पाटवण्यासाठी त्यांनी काही दिवस एका पथकाला घरी ठेवले होते. या पथकाच्या पाहणीत होरी फक्त 30 मिनिटेच झोपत असून त्यानंतर ते आपले काम सुरू करतात. तसेच दिवसभर ते उत्साही असतात. ते थकलेले किंवा कंटाळलेल कधीही दिसत नाही, असे पथकाला आढलले आहे. तसेच त्यांच्या आरोग्य तपासणीहीत ते तंदुरुस्त असल्याचे दिसलून आले आहे. त्यामुळे कमी झोपूनही त्यांच्या शरीरावार कोणताही दुष्परिणाम झालेला नाही.