
जखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावल्याने हे अँटिबॅक्टेरियलचे काम करते. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चुना एक चमचा मधामध्ये मिसळून लावा. हळदीचे दूध नियमित प्या.
चार हजार वर्षापूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कक्र्युमिनसारखे अनेक औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बचाव करतात. हळदीला दुस-या औषधी पदार्थामध्ये मिसळून वापरल्यास त्याचे अनेक फायदे होतात.
मजबूत हाडे : अर्धा चमचा हळद, अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
मजबूत हिरडय़ा : अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरडय़ांची मालिश करा.
चमकदार दात : अर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा खातासोडा मिसळून दात घासल्याने दात चमकतात.
सर्दी-पडसे, ताप : एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या. हे मिश्रण मधामध्ये मिसळून खा.
जखम : जखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावल्याने हे अँटिबॅक्टेरियलचे काम करते. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चुना एक चमचा मधामध्ये मिसळून लावा. हळदीचे दूध नियमित प्या.
घशात वेदना : एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या करा. हळदीचे दूध प्या.
त्वचारोग : एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून त्वचारोगावर नियमित लावा.