अबब! चक्क 62 लाखची फाटकी आणि मळकी Jeans विकली गेली

    सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. फाटकी अन् मळकी असलेली ही जिन्स तुम्ही टाकून द्याल पण ही जीन्स न्यू मेक्सिकोमध्ये 62 लाख रुपयांना विकण्यात आली. तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की जीन्स खुप जास्त जुनी आहे, मळकी आहे एवढंच काय तर फाटकी आहे. ओल्ड फॅशन असलेल्या लेव्हिस कंपनीच्या या जीन्सचा लिलाव झालाय. लिलावतात डिओगोच्या एका क्लोथिंग डिलरने डेनिम डॉक्टर्सचे मालक जीप स्वीवनसनसोबत मिळून ही जीन्स विकत घेतली.

    • या जीन्समध्ये काय खास आहे?

    ही जीन्स खुप जुनी आहे. 1880 सालातील ही जीन्स आहे. ही जीन्स आतापर्यंत असणे ही खुप हटके बाब आहे. त्यानंतर अगदी काही वर्षापूर्वी जुन्या खाणीत ही जीन्स सापडली होती. तिथे काम करणाऱ्या एका मजुराने ही जीन्स आपल्याकडे ठेवून घेतली होती. या जीन्सचे डिझाईन खुप हटके आणि जुन्या फॅशनचे आहे. सध्या सोशल मीडियावर या जीन्सचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.