विकास दिव्यकीर्ती यांच्या मते,मुलांना दैनंदिन जीवनातील ‘या’ गोष्टी शिकवल्या नाही तर मुलं आत्महत्या करू शकता

पालकांनी आपल्या मुलांना काय शिकवले पाहिजे काय शिकवू नये याबाबत सांगितले आहे. त्यांनी दिलेला हा सल्ला तुम्हाला देखील तुमच्या मुलांसाठी उपयोगी पडू शकतो.

  आपल्या मुलांचे संगोपन, पालनपोषण करणे ही प्रत्येक आई वडिलांची जबाबदारी असते. मात्र यामध्ये पालकांची थोडी जरी चूक झाली त्याचे परिणाम मुलांसोबतच आई वडिलांना देखील सहन करावे लागते. बदलत्या काळानुसार मुलांमध्ये सुद्धा अनेक नवनवीन बदल होत असतात. त्यांचे योग्यरीत्या पालपोषण करणे फार गरजेचे आहे. याबाबत तज्ञ देखील सल्ला देतात. दृष्टि  IAS चे संस्थापक आणि संचालक विकास दिव्यकीर्ती यांनी त्यांच्या भाषणामध्ये पालकांना एक खास सल्ला दिला आहे. पालकांनी आपल्या मुलांना काय शिकवले पाहिजे काय शिकवू नये याबाबत सांगितले आहे. त्यांनी दिलेला हा सल्ला तुम्हाला देखील तुमच्या मुलांसाठी उपयोगी पडू शकतो. चला तर जाणून घेऊया विकास दिव्यकीर्ती यांनी आपल्या भाषणात पालकांना नेमका कोणता सल्ला दिला आहे.

  विकास दिव्यकीर्ती म्हणाले, मी माझ्या आयुष्यामध्ये अशा तीन लोकांना ओळखतो ज्यांनी जे खूप कर्तृत्वान आहेत. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या संस्थांमधून शिक्षण घेतले आणि ते आयएएस आणि आयपीएस झाले. या तिघांनीही काम करत असतानाच आपलं जीवन संपवलं आणि त्याचं कारण म्हणजे काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमध्ये त्यांना सांभाळता येत नव्हत्या.

  मुलांना काय शिकवावे:

  लोकांना त्यांच्या आयुष्यातील कोंडी सहन करता आली नाही किंवा विसरता आली नाही की ते आपले जीवन संवण्याचा प्रयत्न करतात. त्यावर विकास दिव्यकीर्ती म्हणाले, हे लोक त्यांच्या समस्या सोडत नाहीत आणि यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होतो. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही मुलांना इतिहास, गणित आणि अर्थशास्त्र इत्यादी अभ्यासात अनेक विषय समजावून सांगतो. हे सर्व देखील महत्त्वाचे आहेत परंतु एक गोष्ट आपण शिकवत नाही ती म्हणजे आपल्या भावना समजून घेणे आणि त्यांना सामोरे जाणे. यातूनच पालक अनेकदा चुकतात.

  आयुष्यातील सर्वात महत्वाचा धडा:

  ज्यावेळी असं वाटतं आता सर्वकाही संपलं आहे किंवा आजूबाजूचे सर्व काही विषारी बनले आहे तेव्हा आपण या वातावरणात श्वास घेऊ शकत नाही, तेव्हा आपण स्वतःला या वातावरणातून कसे बाहेर काढावे, आपण याकडे यावे आणि आपल्या मुलांना देखील हा धडा शिकवला पाहिजे इतर. जीवनात यशस्वी होण्यासाठीच नव्हे तर आनंदाने जगण्यासाठीही हे खूप महत्त्वाचे आहे.

  भावनांवर नियंत्रण ठेवा:

  विकास दिव्यकीर्ती यांच्या मते, मनुष्याने त्याच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. तसेच भावनांवर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे नात्यामध्ये परिपक्वता येते आणि व्यक्ती कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी सावध होतो. तुम्ही तुमच्या मुलांच्या भावना समजून घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यास शिकवले पाहिजे. कठीण काळात कोणतीही चुकीची पावले उचलणे थांबण्यास शिकवावे.