कोरोनानंतर आता आणखी एक महामारी, तरुण पडतायेत बळी, WHO ने दिला सतर्कतेचा इशारा!

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीमध्ये एकाकीपणामुळे होणारी समस्या दिवसाला १५ सिगारेट ओढल्याने होणाऱ्या हानीइतकीच धोकादायक असू शकते.

    जागतिक आरोग्य धोक्यात : एकटेपणा हा मानसिक आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. आज संपूर्ण जगाची मोठी लोकसंख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहे. विविध देशांतील आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एकाकीपणामुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक समस्याही उद्भवू शकतात. जे लोक दीर्घकाळ एकटे राहतात त्यांना नैराश्य, तणाव आणि आत्महत्या यासारख्या विचारांचा सामना करावा लागतो. यामुळेच WHO ने एकाकीपणाला गंभीर आरोग्य समस्या (ग्लोबल हेल्थ थ्रेट) मानले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, एकाकीपणाची समस्या जगभरात वेगाने पसरत आहे. भारतासह अनेक देश त्याच्या विळख्यात आहेत. याकडे नवीन महामारी म्हणून पाहिले जात आहे. जाणून घेऊया त्याचे धोके…

    डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीमध्ये एकाकीपणामुळे होणारी समस्या दिवसाला १५ सिगारेट ओढल्याने होणाऱ्या हानीइतकीच धोकादायक असू शकते. द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने लोकांमधील सामाजिक संबंध सुधारण्यासाठी जपानमध्ये एक आयोग सुरू केला आहे. लोकांमधील एकाकीपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी हा आयोग एक विशेष जागतिक उपक्रम आहे, ज्याच्या मदतीने हा धोका कमी होऊ शकेल अशी आशा आहे.

    मे २०२२ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, भारतातील तरुणांमध्ये एकाकीपणामुळे होणाऱ्या समस्या वेगाने वाढत आहेत. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे २०.५% प्रौढ व्यक्तींना एकाकीपणामुळे समस्यांचा सामना करावा लागतो. देशातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत आहेत. कार्यसंस्कृती, दिनचर्या, घर आणि कुटुंबापासून दूर राहणे यासारख्या समस्यांमुळे शहरी भागात राहणारे तरुण एकटेपणाचे अधिक बळी ठरत आहेत.