आरोग्याबरोबरच चेहऱ्यासाठीही कोबी फायदेशीर! कोबीचा फेसपॅक कसा बनवायचा जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोबीपासून फेसपॅक कसा तयार करायचा ते. कोबीचा फेसपॅक चेहऱ्यसाठी फार फायदेशीर ठरतो आणि चेहऱ्यातील मृत पेशीही काढून टाकतो.

  शरीराच्या तंदुरुतीसाठी भाज्यांचे सेवन फायदेशीर असते. भाज्यांमध्ये अनेक पोषकतत्वे आढळली जातात, जी आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का शरीर निरोगी ठेवण्यापासून ते चेहरा चमकदार करण्यासाठी तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता. चेहऱ्याच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी भाज्या प्रभावी ठरतात. यासाठी तुम्ही कोबीच्या फेसपॅकचा वापर करू शकता.

  कोबी एक अशी भाजी आहे जी तुम्हाला बाजारात सहजरीतीने उपलब्ध होईल. घराघरात वापरल्या जाणाऱ्या या कोबीचा वापर तुम्ही चेहरा चमकवण्यासाठी करू शकता. कोबीची भाजी खायला जितकी रुचकर असते तितकीच ती चेहऱ्यासाठीही फायदेशीर मानली जाते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे घटक असतात, जे त्वचेचे पोषण करतात आणि ती निरोगी आणि चमकदार बनवतात.

  कोबीपासून बनवा फेसपॅक
  कोबीचा फेसपॅक बनवण्यासाठी कोबीचा रस घ्या आणि त्यात चिमूटभर हळद आणि चमचाभर मध घाला. मग याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर अथवा मानेवर २० ते २५ मिनिटे लावून ठेवा आणि मग पाण्याने तुमचा चेहरा स्वछ धुवून टाका. यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता.

  कोबी आणि कोरफड
  कोबी आणि कोरफडचा फेसपॅक बनवण्यासाठी २ चमचे कोबीचा रस आणि १ चमचा मध घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वछ पाण्याने तुमचा चेहरा धुवून टाका आणि मॉइश्चरायझर लावा.

  कोबीचे फायदे
  कोबीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याशी निगडित सर्व समस्या दूर होतात. हा कोबीचा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून ३ ते ४ वेळा वापरू शकता. याने तुमच्या चेहऱ्याला पोषण मिळते आणि हा त्वचेलाही थंडावा देतो. त्याचबरोबर हा फेसपॅक तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यासही मदत करतो. मात्र लक्षात ठेवा हा फेसपॅक वापरण्याआधी तुमचा चेहरा पाण्याने चांगला धुवून स्वछ करून घ्या. अनेकांना याची ऍलर्जी असू शकते, त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.