पठ्ठ्याचं नशीबच फळफळलं! पत्नीनेच पतीला दिली २ गर्लफ्रेंडसोबत लग्नाची संमती

एक व्यक्ती आपल्याच पत्नीच्या परवानगीने आपल्या २ गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, यानंतर आसपासच्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि पत्नीच अशी परवानगी कशी देऊ शकते, अशीही विचारणा होऊ लागली. जर्मनीतील कोलोन शहरातून हे प्रकरण समोर आले आहे.

    लग्न हे सात जन्माचे नातं असते असे म्हणतात. परंतु जर पत्नीने आपल्याच पतीला तिच्या मर्जीने दोन गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याची परवानगी दिली, असे जर म्हटले तर नक्कीच तुम्हाला शॉक बसेल. परंतु हे अगदी खरे आहे. जर्मनीमधून सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे.

    एक व्यक्ती आपल्याच पत्नीच्या परवानगीने आपल्या २ गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, यानंतर आसपासच्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि पत्नीच अशी परवानगी कशी देऊ शकते, अशीही विचारणा होऊ लागली. जर्मनीतील कोलोन शहरातून हे प्रकरण समोर आले आहे.

    माहितीनुसार, ३५ वर्षीय मार्को सँटो सिल्वाने कायदेशीररित्या ३५ वर्षीय डेनिएला सिल्वा हिच्यासोबत लग्न केले असून दोघेही २०१२ पासून एकत्र राहत आहेत. परंतु आता मार्को सँटो सिल्वानं आपल्या २ गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याची घोषणा केली आहे. २०१९ मध्ये त्याची भेट जेसिका आणि कामिला यांच्याशी झाली होती. यांच्या संवादादरम्यान मैत्री झाली आणि त्यानंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर मार्कोने त्यांना आपल्या पत्नीशीदेखील भेट घडवून आणली.

    मार्को आणि डेनिएला यांची दोन मुलेही आहेत. असे असले तरी तो आपले नातं पुढे नेण्याच्या तयारीत आहे. जेसिका आणि कामिलादेखील या लग्नासाठी तयार असल्याचे मार्कोचे म्हणणे आहे. दरम्यान, आपल्या आनंदावर विरजण पडू नये यासाठीही भीती वाटत असल्याचे त्याने नमूद केले. तसेच लोकं आपल्यावर जळत असल्याने आपण सांभाळून पुढे जात असल्याचेही त्याने सांगितले.

    Amazing miracles The wife gave consent to the husband to marry 2 girlfriends