जवसाच्या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा -३ चा उत्तम सोर्स, शरीरासाठी ठरतील वरदान

आहारात बदल केल्यानंतर शरीराला योग्य तो पोषण मिळते. उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये आहारात जवसाच्या बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. जवसाच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात.

  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. बाहेर कडक ऊन पडल्यानंतर आपल्याला सतत काहींना काही थंड पदार्थ खावेसे वाटतात. पण रोगप्रतिकार शक्ती चांगली करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतूनुसार हवामानामध्ये बदल होत जातो. त्यानुसार आपल्या आहारात देखील बदल करणे गरजेचे आहे.

  आहारात बदल केल्यानंतर शरीराला योग्य ते पोषण मिळते. उन्हाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये आहारात जवसाच्या बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. जवसाच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. ज्यामुळे शरीराला पोषण मिळते. शरीर निरोगी आणि हेल्दी राहते. याला फ्लॅक्स प्लांटचे बी देखील बोलले जाते. याचा रंग जर रंग लालसर तपकिरी किंवा पिवळासर असेल तर बिया तुम्ही खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला जवसाच्या बिया खाल्याने नेमके काय फायदे होतात याबद्दल सांगणार आहोत.

  जवसाच्या बियांचे फायदे:

  फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत:

  जवसाच्या बियांमध्ये फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आढळून येतो. अल्फा-लिनोलेनिक ऍसिडने (एएलए) समृद्ध असलेल्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जवसाच्या बियांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे हाडांचे आरोग्य सुधारते. गुडघे दुखी किंवा हाडांसंबंधित समस्या असेल्या व्यक्तींनी जवसाच्या बियांचे आहारात सेवन करावे.

  फायबर समृद्ध:

  जवसाच्या बिया फायबरने समृद्ध असतात. सकाळी उठल्यानंतर या बियांचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात . जवसाच्या बिया पाण्यात भिजत टाकून खाल्ल्याने त्याचे जेलमध्ये रूपांतर होते.

  उच्च प्रथिने:

  जवसाच्या बियांमध्ये उच्च प्रथिने असतात. जवसाच्या बिया खाल्याने शरीरातील प्रथिनांची पातळी वाढते. पोटॅशियम हे एक खनिज असून पेशी आणि स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक आहे. जवसाच्या बियांमध्ये केळ्यापेक्षा जास्त पोटॅशियम असते.

  वजन कमी करणे:

  वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचा वापर केला जातो. जवस भूक कमी करून आपले पोट भरण्याची जाणीव करून देतात. जवसमधील लिग्नांसमुळे पेशी चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे वजन लवकर कमी होते. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल अशांनी नेहमी जवस बारीक करुन खाल्ले पाहिजे. मात्र जवसाचे जास्त सेवन केल्याने जुलाब लागू शकतात.

  त्वचा चमकदार राहते:

  जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे जवसाचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जवस खाल्ल्याने त्वचेचा ओलावा कायम राहतो. त्वचा गुळगुळीत होण्यास मदत होते. जवस खाल्ल्याने त्वचेवर वर लवकर सुरकुत्या पडत नाही. त्वचेत पाण्याची कमतरताही भासत नाही.