जेट एयरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे कॅन्सरने निधन, महिलांनी वेळीच घ्या काळजी

राज्यभरातील अनेक रुग्ण कॅन्सरने त्रस्त आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोनशे पेक्षा अधिक प्रकारचे कॅन्सर आहेत.

  जेट एयरवेज (Jet Airways) चे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल (Anita Goyal Passes Away) यांचे १६ मे ला निधन झाले. त्या मागील कित्येक दिवसांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या. पण अखेर कॅन्सरशी झुंझ देत असलेल्या अनिता गोयल यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. आज पहाटे ३ वाजता त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नरेश गोयल यांना अटक करण्यात आली होती. पण पत्नीला भेटण्यासाठी सशर्त जामीन नरेश गोयल यांना देण्यात आला होता. पत्नी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त असून आपल्याला तिच्यासोबत राहायचंय, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली होती. त्यानंतर त्यांना जमीन देण्यात आला. पण नेमकं कॅन्सर कशामुळे होतो? याची लक्षण काय? जाणून घ्या सविस्तर..

  राज्यभरातील अनेक रुग्ण कॅन्सरने त्रस्त आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोनशे पेक्षा अधिक प्रकारचे कॅन्सर आहेत. कॅन्सर हा आजार शरीरातील कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. कर्करोग शरीराच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढीमुळे होते. नंतर त्याचे रूपांतर ट्युमरमध्ये होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कॅन्सरची लक्षणे ओळखणे फार गरजेचे आहे. असे न केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कॅन्सरसंबंधित लक्षणे जाणवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.

  कॅन्सरची लक्षणे:

  • अचानक वजन कमी होणे
  •  ताप येणे
  •  सतत थकवा जाणवणे
  •  अचानक त्वचेत बदल होणे
  •  शरीरावरील जखमा बऱ्या न होणे
  •  रक्तस्त्राव
  •  शरीरातील कोणत्याही भागात गाठ येणे, यांसारखी लक्षणे जाणवू लागतात.

  कॅन्सरवर उपाय:

  कॅन्सर झालेल्या रुग्णांना केमोथेरपी करावी लागते. केमोथेरपीची औषधं रक्तामधून दिली जातात. यामुळे संपूर्ण शरीरात ते औषध पसरते. कॅन्सर पेशींवर ही औषधं गेल्यानंतर ते कॅन्सर पेशी मारून टाकण्याचे काम करते. कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिओथेरपीचा देखील वापर केला जातो. रेडिएशन शरीरातल्या एका छोट्या भागातल्या कॅन्सर पेशी नष्ट करू शकतात. त्यामुळे या औषधांचा वापर कॅन्सर रुग्णांना बरं करण्यासाठी केला जातो. या औषधांचा वापर मर्यादित ठेवावा लागतो नाहीतर सुदृढ पेशींना हानी पोहचते. योग्य पद्धतीने कॅन्सरवर उपचार न झाल्यास अनेक गंभीर समस्या उदभवू शकतात.