उन्हाळ्यात चेहऱ्याला लावा ‘हे’ कुलिंग फेसपॅक, चेहऱ्याला होतील फायदे

सध्या सगळीकडे कडक उन्हाळा सुरु झाला आहे. या उन्हाळ्यात चेहऱ्यासंबंधित अनेक समस्या जाणवण्याची शक्यता असते. तापमानात वाढ झाल्यानंतर आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

  सध्या सगळीकडे कडक उन्हाळा सुरु झाला आहे. या उन्हाळ्यात चेहऱ्यासंबंधित अनेक समस्या जाणवण्याची शक्यता असते. तापमानात वाढ झाल्यानंतर आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. अनेकदा उन्हाळ्यात पिपंल्स, घामोळ्या, जळजळ यांसारख्या अनेक समस्या महिलांना जाणवतात. त्यामुळे त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.अनेकदा कामानिमित्त बाहेर जाताना आपण तोंडाला स्कार्फ बांधून जायला विसरतो मात्र यामुळे आपल्या त्वचेवर त्याचे वाईट परिणाम होतात. त्वचा लाल होणे, डाग येणे यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. मात्र आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही स्किन केअर रुटीनमधील फेसपॅक सांगणार आहोत. ज्याचा वापर केल्याने त्वचा हायड्रेट राहते. चला तर जाणून घेऊया कुलिंग फेस पॅक घरच्या घरी कसा बनवायचा..

  चंदन आणि गुलाब पाणी

  चंदन आणि गुलाब पाणी वापरल्याने त्वचेला थंडावा मिळतो. तुम्ही चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. हा फेस पॅक तुम्ही घरच्या घरी लगेच बनवू शकता. यासाठी १ चमचा चंदन पावडर घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर हि पेस्ट त्वचेला लावून १५ ते २० मिनिटांसाठी ठेवून द्या. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून द्या. आठवड्यातून दोनदा असे केल्याने त्वचेला अनेक फायदे होतील.

  मुलतानी माती आणि गुलाब पाणी

  उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावून ठेवा. १५ मिनिटानी हा फेसपॅक स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

  पुदिना आणि दही

  पुदिना हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पुदिन्याची पाने सरबत बनवण्यासाठी देखील वापरली जातात. दही आणि पुदिन्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याला थंडावा मिळतो. दही थंड असल्याने त्वचे संबंधित अनेक समस्या यामुळे दूर होतात. दही आणि पुदिन्याचा फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा कप दही घेऊन त्यात पुदिन्याची पाने बारीक करून टाकावी. त्यानंतर हे मिश्रण त्वचेला लावून १० मिनिट ठेवून नंतर धुवून टाका. यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतील.