नाभीत खोबरेल तेल लावणे फायदेशीर! जाणून घ्या कारणे, तज्ज्ञांनी दिला सल्ला

नाभीत नारळाचे तेल टाकण्याची परंपरा फार जुनी आहे. नाभीत नारळाचे तेल टाकण्याने शरीराला अनेक फायदे होतात, तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात याचे फायदे...

  कोणतेही तेल म्हटले की त्यात नारळाच्या तेलाचा समावेश हा असतोच! नारळाचे तेल हे अनेक गुणधर्मांनी युक्त असते. मॉइश्चरायझिंग गुणधर्माने समृद्ध खोबरेल तेल केसांना ताकद देते आणि चेहऱ्याची चमक कायम ठेवते. वास्तविक पाहता नाभिमध्ये तेल टाकण्याची प्रथा फार जुनी असून अनेक शतकांपासून ती चालू आहे. नारळ तेलामुळे फॅटी एसिडचे सहज पचन होते. नारळ तेल फॅट म्हणून शरीरात जमा होत नाही. नारळाचे तेल नाभीत टाकणे हा एक घरगुती उपाय आहे.

  घराघरात वापरले जाणारे नारळाचे तेल मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यास मदत करत असते. नारळाच्या तेलात व्हिटॅमिन डी अधिक प्रमाणात असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण याचा वापर करू शकता. आईच्या स्वयंपाकघरात तर नेहमीच तुम्ही हे खोबरेल तेल पाहिले असेल. मुळात नारळाचे तेल हृदयासाठी फायदेशीर मानले जाते.

  आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नारळाचे तेल शरीराचा समतोल राखण्यास मदत करते. वास्तविक पाहता नाभीला तेल लावल्याने नाभीचक्र संतुलित होण्यास मदत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च डिटॉक्सिफिकेशननुसार, पेचोटी ग्रंथी पोटाच्या बटणाच्या मागे स्थित आहे, ज्याच्या वर ७२,०० पेक्षा जास्त नसा आहेत. नाभीत खोबरेल तेल लावल्याचे अनेक फायदे असतात जसे की, डोळे कोरडे पडणे, दृष्टी खराब होणे, स्वादुपिंडाची समस्या आणि टाच फुटणे या समस्या याने दूर होतात. याशिवाय, हे ओठ, चेहरा, चमकदार केस आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ थेंब खोबरेल तेल टाकून नाभीला मसाज करू शकता. यामुळे शारीरिक समस्यांपासूनही आराम मिळतो.

  जाणून घ्या नाभीत तेल लावण्याचे कारण

  यासंदर्भात आयुर्वेद तज्ज्ञ अनिल बन्सल सांगतात की, नाभीला नारळाचे तेल लावल्याने शरीराच्या सर्व अवयवांना आराम मिळतो. शरीराला वेदना होत असल्यास नारळाचे तेल लावणे एक उत्तम पर्याय ठरेल. नारळाच्या तेलाचे अनेक फायदे असतात जसे की, त्वचा निरोगी राहणे, शरीरातील वेदना दूर होणे, याशिवाय शरीराला तणावमुक्त ठेवण्यासही याची मदत होती.

  गर्भवती महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या मुलासाठी नाभी ही त्याची जीवनरेखा असते. नाभीसंबधीच्या दोरखंडातूनच बाळाला अन्न आणि ऑक्सिजन मिळते. वास्तविक, नाभी संपूर्ण शरीराशी रक्तवाहिन्यांच्या मदतीने शरीराच्या अवयव आणि मज्जातंतूंद्वारे जोडलेली असते. अशा परिस्थितीत जेव्हा नाभीवर तेल लावले जाते तेव्हा त्याचा संपूर्ण शरीराला फायदा होतो.