चंदनाचे तेल त्वचेला लावल्याने होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

त्वचेसंबंधित अनेक समस्यांवर चंदन वापरले जाते. चंदनाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात, असे आजीसुद्धा सांगायची.

  चंदन (Sandalwood) हे अतिशय थंड असते. चंदनच्या झाडाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून चंदनाचा वापर खरेदी आणि विक्रीसाठी केला जात आहे. भारतीय उपखंड, चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्स व वायव्य ऑस्ट्रेलिया प्रदेशांमध्ये चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. चंदनाच्या तेलात असणाऱ्या सॅटॅलॉल या रसायनामुळे त्याला सुगंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहे. त्वचेसंबंधित अनेक समस्यांवर चंदन वापरले जाते. चंदनाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात, असे आजीसुद्धा सांगायची. पण चंदनच्या तेलाचे इतर काही फायदे देखील आहेत. चला तर जाणून घेऊया चंदनाचे तेल त्वचेसाठी किती फायदेशीर आहे…

  टॅनिंग काढून टाकते:

  चंदनाचे तेल लावल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होऊन चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे चेहरा टॅन होतो. अशावेळी तुम्ही चंदनाच्या तेलात किंवा पावडरमध्ये मध, लिंबाचा रस आणि दही मिसळून पेस्ट बनवून त्वचेवर लावू शकता. ही पेस्ट त्वचेवर लावल्यानंतर १० मिनिट ठेवून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होईल.

  उष्णतेमुळे आलेले पुरळ बरे होतात:

  सध्या सगळीकडे कडक ऊन पडत आहे. उन्हातून बाहेर जाऊन आल्यावर शरीराला जास्त प्रमाणात घाम येतो. घाम आल्यानंतर पुरळ येणं ही समस्या सगळ्यांचं जाणवते. अशावेळी १ चमचा चंदन पावडर किंवा तेल घेऊन त्याची पेस्ट बनवून त्वचेला लावून ठेवा. यामुळे त्वचेवर थंडावा जाणवेल आणि पुरळ कमी होतील. जर तुमच्याकडे नैसर्गिक चंदन पावडर असेल तर तुम्ही ती तुमच्या लहान मुलांनादेखील लावू शकता.

  वृद्धत्व विरोधी गुणधर्म:

  चंदनाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे फ्री रॅडिकल्स कमी होतात. त्वचा सैल होत नाही आणि सुरकुत्याही पडत नाहीत.जर तुम्हाला तुमची त्वचा तरुण हवी असेल तर चंदनाच्या तेलात मध आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटं ठेवून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

  डाग कमी होतात:

  उन्हाळ्यामध्ये त्वचेवर उष्णतेमुळे पिंपल्स येतात. मात्र त्याचे डाग काहीवेळेस आपल्या त्वचेवर तसेच राहतात. या डागांवर चंदनाचे तेल लावल्याने हे डाग कमी होण्यास मदत होते. चंदनाच्या वापराने दुखापतीच्या खुणाही नाहीशा होतात. चंदनाचे तेल त्वचेवर लावल्यानंतर काही वेळ तसेच ठेवून १० ते १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवून टाकावी. पण जर तुमच्याकडे चंदनाचे तेल नसेल तर तुम्ही त्वचेनुसार तेल मिसळून चंदन पावडर लावू शकता. मुरुम आणि मुरुमांमुळे होणारी सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी चंदनाचे तेल फायदेशीर आहे. यामुळे मुरूम कमी होतात.