बटाटा उन्हाळ्यामध्ये खराब होत आहे का? जाणून घ्या सोप्या टीप्स

बटाटा रोजच्या वापरातील असून देखील खराब होऊ शकतो. यासाठी काही टीप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  उन्हाळ्यामध्ये फळांचे आणि भाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या फळांची आणि भाज्यांची योग्य अशी काळजी घेणे आणि त्यांची नीट साठवणूक करणे देखील गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये भाज्या खराब होतात. बटाटा रोजच्या वापरातील असून देखील खराब होऊ शकतो. यासाठी काही टीप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  1.  अनेकजण बटाटे आणि कांदे एकाच टोपलीत ठेवतात. हे अजिबात करू नका. कांदा सोबत ठेवल्यास कमी वेळात बटाटे फुटू लागतात. चवही बदलते. दोन्ही वेगवेगळे ठेवा.

  2. ज्या जागी थेट सूर्यप्रकाश येत असेल त्या जागी बटाटे ठेवू नका. यामुळे ते लवकर सुकतात आणि बटाट्यातील ओलावा निघून जातो. बटाटे थोडे अंधार असलेल्या ठिकाणी साठवणे फायद्याचे ठरते. बांबूच्या टोपलीत किंवा कागदाच्या पिशवीत ठेवा. जर तुम्ही त्यांना प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवलं तर ते लवकर कुजायला लागतात. अशा परिस्थितीत, एक कुजलेला बटाटा देखील टोपलीतील इतर बटाट्यांना खराब करतो.

  1. बाजारातील बटाटे ओले झाले असतील तर ते सुकवल्याशिवाय आतमध्ये ठेवू नका, अन्यथा ते लवकर कुजू शकतात. पंख्याखाली किंवा हलक्या सूर्यप्रकाशात अर्धा तास चांगले ठेवा. आणि वाळल्यानंतर आतमध्ये ठेवा.

   

  1. गरम तापमानात बटाटे साठवणे टाळा. कमी प्रकाश आणि वातावरण थंड असेल अशा ठिकाणी ठेवा. यामुळे ते बरेच दिवस ताजे राहतील.

   

  1. नाशपाती आणि केळीसारख्या काही फळांसह बटाटे ठेवू नका. ही फळे काही रसायने सोडतात, ज्यामुळे बटाटा लवकर पिकतो. अंकुर वाढू शकतो.

   

  1. चुकूनही बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका. यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होऊ शकते. अशा प्रकारच्या बटाट्याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

   

  1. जर तुम्ही भाजी करण्यासाठी जास्त बटाटे कापले असतील तर ते कापलेले बटाटे ठेवू नका. हे काळे होतात. जर तुम्ही सकाळी जास्त चिरले असेल तर ते पाण्यात टाकून दिवसा किंवा संध्याकाळी वापरुन टाका.