उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांसंबंधित ‘या’ चुका करणे टाळा

राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून उन्हाळा वाढला आहे. सगळीकडे तापमानात वाढ झाली आहे.

    राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून उन्हाळा वाढला आहे. सगळीकडे तापमानात वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. या दिवसांमध्ये केसांचे आरोग्य सार्वधिक बिघडते. केसांच्या समस्या वाढू लागतात. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. केस कितीही वेळा धुतले तरी तेलकट आणि चिकट दिसतात. या दिवसांमध्ये केसांची सार्वधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कडक ऊन आणि घामाचा परिणाम आपल्या केसांवर लगेच दिसून येतो. जास्त घाम आल्याने केस लगेच ओले आणि चिकट होतात. तर अनेक महिलांचे केस हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गळतात.त्यामुळे उन्हाळ्यात केसांची सार्वधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का उन्हाळ्यात केस का गळतात? चला तर जाणून घेऊया कारणे..

    सर्वच महिलांना लांब आणि घनदाट केस हवे असतात. केसांमुळे स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, आत्मविश्वास वाढतो.पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. मोठ्या प्रमाणात केस गळती झाल्याने टाळू रिकामी होत जाते. उन्हाळ्यात केस गाळण्यामागे अनेक कारणे देखील आहेत. सतत केस गळती झाल्यानंतर टाळू रिकामी झाल्याने नवीन केस येणं कठीण होऊन जातं. उन्हाळा वाढल्यामुळे घराच्या बाहेर पडल्यानंतर केसांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. उन्हातून बाहेर गेल्यानंतर सूर्य किरणांशी थेट संपर्क येतो. यामुळे सूर्याची अतिनील किरणे केसांची आर्द्रता शोषून घेतात. त्यामुळे केसांना स्कार्फ बांधणे गरजेचे आहे.

    उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त घाम येतो. त्यामुळे केस खराब आणि चिकट दिसू लागतात. जास्त प्रमाणात घाम आल्याने केसांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. बॅक्टेरिया वाढल्यानंतर अनेकवेळा केसांमध्ये कोंडा होतो. कोंडा झाल्यानंतर हळूहळू केस गळण्यास सुरुवात होते. काही महिलांना केस घट्ट बांधण्याची सवय असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातून कमीत कमी दोनदा केस धुवणे गरजेचे आहे. घामामुळे केस चिकट आणि कोरडे पडू लागतात. अश्यावेळी केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अन्यथा केसांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतील.