
वाढते वय लपविण्यासाठी म्हणजेच तरुण दिसण्यासाठी त्याची नेहमी धडपड सुरु असते. दिर्घकाळ तरुण राहण्यासाठी या गोष्टी टाळा.

सिगारेट ओढल्यामुळे आपले वय जास्त दिसून येते. धूम्रपान करणार्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

आपण हे बऱ्याच वेळा ऐकले असेल की तणाव एखाद्या व्यक्तीस वृद्ध बनवतो. आता हे प्रयोगामधूनही सिद्ध झाले आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार रात्रीची चांगली झोप तुम्हाला जास्त काळ तरूण ठेवू शकते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी आठ तासांची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे.

व्यायामाच्या अभावामुळे शरीरात लवचिकता राहत नाही. त्यामुळे भविष्यात बर्याच समस्या उद्भवतात. कारण व्यायामाचा अभाव देखील लोकांना लवकर वृद्ध बनवत आहे.

तुमचा विश्वास नाही बसणार, पण सन टॅनिंगमुळे आपल्या चेहर्यावर सुरकुत्या येऊ शकतात. जरी आपल्या त्वचेवर जळजळ होत नसली, तरीही जास्त सुर्यप्रकाशामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते.

हसण्याने काळानुसार दिसू लागलेल्या सुरकुत्या कमी होतात. हसणे आपल्याला आनंदी ठेवते आणि जगण्याची उर्जा देते.