सकाळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टी पाहणं टाळावं? जाणून घ्या

    आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. अशा स्थितीत सकाळी उठल्याबरोबर अनेकजण देवाचे नाव घेत देवाला स्मरण करतात. देवाच्या नावासोबतच अशा काही गोष्टींकडे पाहणेही टाळावे, ज्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. चला जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार अशाच काही गोष्टींबद्दल ज्या सकाळी उठल्यानंतर करू नयेत.

     

    सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहू नये. असे करणे अशुभ आहे. वास्तूनुसार, सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिल्यास संपूर्ण रात्रीची नकारात्मक ऊर्जा दूर होते. असे केल्याने दिवसभर तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता राहते. त्याचा परिणाम दिवसभराच्या कामावर दिसून येतो. भारतीय समाजात घरांमध्ये हा नियम नेहमीच केला जातो की रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतरच झोपावे.

    यामागेही मोठे कारण आहे. अस्वच्छ स्वयंपाकघराने नकारात्मकता वाढते आणि रात्री स्वयंपाकघर असेच राहिल्यास सकाळपासून घाण भांडी दिसताच नकारात्मकता येते. सकाळी उठल्यावर बंद वस्तूकडे पाहू नका, कारण सकाळी उठल्यावर नवीन उर्जा आणि आंनदाने उठतो, पण आशा वेळी बंद वस्तू पाहिल्यावर नकारत्मक उर्जा निर्माण होते, त्यासाठी बंद पडलेल्या वस्तू ह्या वेगळ्या जागी ठेव्यात.