वास्तुशास्त्र सांगतं तुळशीचे असेही फायदे; ‘हे’ उपाय केल्यास मिळेल मोठा लाभ

घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता कधीच येत नाही. तुळशीचे काही अतिशय सोपे उपाय आहेत जे आपल्या अनेक समस्यांवर मात करू शकतात.

  तुळशीचं महत्त्व हे फार मोठं आहे. आयुर्वेदापासून ते धार्मिक. अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचं आणि पूजनीय मानलं जातं. असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात तुळशीचे रोप लावावे. त्यामुळेच अनेक भारतीयांच्या घरी तुळशीचं रोपटं असतंच. भगवान महाविष्णूला (Lord Vishnu) तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. तसेच तुळशीशिवाय श्री हरी विष्णूलाही नैवेद्य प्राप्त होत नाही. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं महत्त्व.

  इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगतात की, घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता कधीच येत नाही. तुळशीचे काही अतिशय सोपे उपाय आहेत जे आपल्या अनेक समस्यांवर मात करू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.

  • पाणी घाला

  जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रोग किंवा आर्थिक संकट येत असेल तर तुळशीला नियमित जल अर्पण करा आणि जल अर्पण करताना वरील मंत्राचा जप करत राहा.

  • इच्छा पूर्ण करण्यासाठी

  शरीराच्या लांबीचा एक पिवळा धागा घ्या आणि हा धागा तुळशीच्या जवळ न्या. तिथे तुमची इच्छा सांगा आणि त्या धाग्यात १०८ गाठी बांधा आणि तुळशीच्या रोपाला बांधा. तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तो धागा सोडा.

  • नकारात्मकता दूर होईल

  घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ५ तुळशीची पाने उशीखाली ठेवा आणि झोपा. या उपायाने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल.

  • पैसे कमावण्याचे उपाय

  जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर सकाळी तुळशीची चार पाने तोडून पितळेच्या भांड्यात २४ तास पाण्यात ठेवा. २४ तासांनंतर ते पाणी घरभर शिंपडा. मुख्य गेटवरून पाणी शिंपडायला सुरुवात करा. त्याचा परिणाम तुम्ही स्वतः पाहाल.