बाथरूममधील बादली आणि मग काळे झाले असतील तर ‘या’ सोप्या उपायाने करा स्वच्छ, पुन्हा नव्यासारखे दिसतील

बाथरूमची बादली आणि मग स्वच्छ करण्याचे अनेक सोपे उपाय आहोत, या उपायाने प्लास्टिकच्या वस्तू नवीन दिसतील.

    सामान्यतः आंघोळीसाठी बाथरूममध्ये फक्त प्लास्टिकच्या बादल्या आणि मग ठेवले जातात. या दोन्ही प्लास्टिकच्या वस्तू दररोज पाण्याच्या संपर्कात आल्याने काळ्या पडतात. त्यामुळे बादली आणि मग रंगहीन होतात. अशा परिस्थितीत ते कसे स्वच्छ करायचे याची युक्ती फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला बाथरूमची बादली आणि मग स्वच्छ करण्याच्या अशा सोप्या पद्धती (Bathroom Cleaning Haks) सांगूया ज्यामुळे या दोन्ही गोष्टी नवीन दिसायला लागतील.

    बाथरूमची बादली आणि मग कसे स्वच्छ करावे?

    बादली आणि मग साफ करण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर ते बादली आणि मग वर लावा आणि व्यवस्थित घासून धुवुन घ्या. असे केल्याने बादली आणि मग पूर्णपणे चमकतील.

    तुम्ही लिंबूने बादलीही चमकवू शकता. याच्या मदतीने पाण्याचे डाग सहज साफ होतात. डिटर्जंट पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा, त्यानंतर ही पेस्ट  मग आणि बादलीला नीट लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर, पाण्याने धुवा.

    त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बाथरूमची बादली ब्लीच पावडरने देखील स्वच्छ करु शकता. तुम्हाला फक्त एका कपमध्ये ब्लीच पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करायची आहे आणि ती बादली आणि मग वर लावायची आहे. याचा एकदाच वापर केल्याने बादली आणि मग स्वच्छ होणार.