गोव्यातील शांत आणि नयनरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या, ‘ही’ आहेत गोव्यातील काही खास ठिकाण

गोव्याला दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक भेट देतात. गोव्यात फिरण्यासारखी बरीच ठिकाण आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिली पसंती गोव्याला दिली जाते. इथे असलेले समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, खाद्यसंस्कृती, साहसी खेळ यांच्यासारख्या बऱ्याच गोष्टी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.

  गोव्याला (Goa) दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक भेट देतात. गोव्यात फिरण्यासारखी बरीच ठिकाण आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिली पसंती गोव्याला दिली जाते. इथे असलेले समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, खाद्यसंस्कृती, साहसी खेळ यांच्यासारख्या बऱ्याच गोष्टी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. त्यामुळे वर्षांच्या बाराही महिने गोव्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. अनेकांना शहराच्या आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी आवडतो तर काहींना शांत ठिकाणी फिरायला जायला आवडत.गोव्यामध्ये निसर्गसौंदर्याचा लपला आहे. मात्र अजूनही काहींना गोव्यातील शांत आणि नयनरम्य समुद्रकिनारे माहित नाहीत. अश्याच काही ठिकाणांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्हाला शांतता, निवांत, सुख या सगळ्या गोष्टी अनुभवता येतील. चला तर पाहुयात कोणती आहेत ती ठिकाणे..

  अगोंडा बीच (Agonda Beach)

  अगोंडा बीच पणजीपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. हा समुद्रकिनारा खूप मनोरंजक आहे. समुद्राच्या लाटांजवळ शांततेत वेळ घालवण्यासाठी हा समुद्र किनारा अगदी योग्य आहे. या समुद्र किनारी पर्यटकांची जास्त ये जा नसल्याने हा समुद्रकिनारा अगदी शांत आहे. मात्र या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला सर्फिंग, कॅम्पिंग आणि स्कीइंग सारख्या अॅक्टिव्हीटी देखील मिळतील. या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी तुम्ही बस किंवा तुमच्या स्वतःच्या कारने देखील जाऊ शकता.

  हॉलंट बीच (Hollant Beach)

  हॉलंट बीच हा फार कमी पर्यटकांना माहित आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची खूप कमी गर्दी असते. त्यामुळे समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा पाहण्यासाठी तुम्ही इथे नक्की जाऊ शकता. पणजीपासून अवघ्या २७ किमी अंतरावर हा समुद्रकिनारा असल्याने तुम्ही इथे बस किंवा स्वतःच्या कारने सहज जाऊ शकता.ज्यांना समुद्रात पोहण्याची आवड आहे असे लोक या समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. हॉलंट बीचवर कयाकिंगचा आनंद लुटता येतो. गोव्यातील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांसोबतच गोव्यातील शांत आणि अनोळखी समुद्रकिनाऱ्यांना देखील नक्की भेट द्या.

  बेतालबाटीम बीच (Betalbatim Beach)

  बेतालबाटीम बीच हा पणजीपासून ३८ किलिमीटर अंतरावर आहे. हा समुद्रकिनारा सूर्यास्ताच्या वेळी पाहणे खूप मनोरंजक आहे. संपूर्ण सूर्यास्त या सुमुद्रकिनाऱ्यावरून पाहता येतो. या समुद्रकिनाऱ्याला सनसेट बीच असे देखील बोलले जाते. दक्षिण गोव्याच्या या किनाऱ्यांवर फार कमी गर्दी असते. अगदी मोजकीच लोक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. गर्दी कमी असल्यामुळे हा समुद्र किनारा नक्कीच तुम्हाला आकर्षित करेल.