निर्सगाच्या कुशीत लपलेल्या महाराष्ट्रातील ‘या’ सुंदर तलावांना नक्की भेट द्या

महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निसर्ग लाभला आहे. यामध्ये डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे, तलाव, ऐतिहासिक किल्ले यांसारख्या अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रत्येक गोष्टीला काहींना काही महत्व आहे.

  महाराष्ट्रातील निसर्गाच्या कुशीमध्ये अनेक सुंदर जागा लपल्या आहेत ज्या आपण कधी पाहिल्यासुद्धा नसतील. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निसर्ग लाभला आहे. यामध्ये डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे, तलाव, ऐतिहासिक किल्ले यांसारख्या अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रत्येक गोष्टीला काहींना काही महत्व आहे. मात्र आपण करिअरच्या नादात बाहेर फिरायला जाण्यासाठी विसरतो. पण जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्या बाहेर शांत ठिकाणी फिरायला जावंस वाटत. जेणेकरून आपल्याला तिथे जाऊन सुखाची अनुभूती मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात राहता येईल. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच काही सुंदर तलावांबद्दल सांगणार आहोत जिथे जाऊन तुम्हाला उन्हाळ्यात सुखाची अनुभूती घेता येईल. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाण..

  वेण्णा तलाव

  महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर तलाव म्हणून वेण्णा तलाव ओळखले जाते. हे तलाव महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये आहे. महाबळेश्वरला महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सचा राजा देखील म्हंटले जाते. वेण्णा तलाव हे सुमारे 28 एकरांवर पसरलेले सुंदर आणि मनमोहक तलाव असल्याने दरवर्षी अनेक पर्यटक हे तलाव पाहण्यासाठी जातात. या तलावातून सुरुवातीच्या काळात पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर हळूहळू हे लोकांसाठी आकर्षणाचे भाग बनले. तलावाच्या सभोवताली हिरवळ असल्याने उन्हाळ्यातही तिथे थंड वातावरण असते.

  पवई तलाव

  महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील सगळ्यात सुंदर तलाव म्हणून पवई तलावाची ओळख आहे. हिवाळा आणि पावसाळ्याव्यतिरिक्त उन्हाळ्यातही हजारो पर्यटक पवई तलावाला भेट देतात. हे कृत्रिम तलाव आहे. मिठी नदीवर 1891 मध्ये बांधलेल्या दोन धरणांमुळे हे तलाव तयार झाल्याचे बोलले जाते. मुंबईतील सगळ्यात मोठे तलाव असल्याने इथे अनेक पर्यटक येतात. पवई तलावाच्या सभोवताली गवताळ प्रदेश आणि हिरवळ असल्याने या तलावाचे सौंदर्या वाढले आहे.

  लोणार सरोवर

  लोणार सरोवर हे क्वचितच कोणालातरी माहित असेल. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 5 हजार वर्षांहून अधिक असलेले लोणार सरोवर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. उल्कापिंडाच्या पृथ्वीशी टक्कर झाल्यानंतर हे तलाव तयार झाले आहे. देशातील एकमेव असे सरोवर आहे जे सतत आपला रंग बदलत असते. या रंग कधी गुलाबी तर कधी निळा दिसतो. तसेच या सरोवराच्या बाजूला पर्वत आणि गवताळ प्रदेश त्याच्या सौंदर्यात भर घालत आहे.