यंदाच्या सुट्टीमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सध्या देशभरात सगळीकडे १ मे चा उत्साह आहे. या दिवसाला महाराष्ट्र दिवस किंवा कामगार दिवस देखील बोलले जाते.

  महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सध्या देशभरात सगळीकडे १ मे चा उत्साह आहे. या दिवसाला महाराष्ट्र दिवस किंवा कामगार दिवस देखील बोलले जाते. महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारश्यामुळे देशभरातील अनेक पर्यटक महाराष्ट्र पाहण्यासाठी येतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी महात्म्यांची, शूरवीरांची, गडकिल्ल्यांची, कवी-लेखकांची, लोककलेची आणि प्राचीन इतिहासाची भूमी आहे. तसेच महाराष्ट्र हे राज्य इतर राज्यापेक्षा थोडं वेगळं आहे. महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या यांसारखे अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. इथे परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती याचे अनेक वेगवेगळे नमुने महाराष्ट्रात पाहायला मिळतील. पण यंदाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या ठिकाणांना आवजून भेट द्या.

  व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स

  व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स या इमारतीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. २०१८ साली युनेस्कोने या प्रसिद्ध इमारतीला ऐतिहासिक वारसा म्हणून जाहीर केले. मुंबई आर्ट डेको ही १४ खाजगी इमारत याचा एका समूह आहे. १९ व्या आणि २० व्या शतकातील इमारतींचा संग्रह असल्याने स्थापत्य कलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

  एलिफंटा लेणी

  मुंबईतील एलिफंटा लेणी ही जगप्रसिद्ध लेणी आहे. ही लेणी पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी भारतामध्ये येतात. गेट वे ऑफ इंडिया’ पासून १० किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. समुद्राच्या पाण्यातून प्रवास करत या लेणीकडे जाता येत. एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुहा या पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. मध्ययुगीन रॉक-कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक सुंदर नमुना आहे. यामध्ये एकूण ७ गुहा आहेत. यातील प्रत्येक गुहेचे विशेष महत्व असल्याने अनेक लोक इथे येतात. ६० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेल्या या लेण्या पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथे येतात.

  वेरूळ लेणी

  वेरूळ लेणी ही पहिल्या पाच स्थळांमध्ये येते. एकसंध खडकातून कोरण्यात आलेल्या लेणीला खूप महत्व आहे. ही लेणी पाहताना कोणत्या तरी गूढ दुनियेत हरवल्यासारखे वाटते. वेरूळ लेणी पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक दरवर्षी भारतामध्ये येतात. १९८३ मध्ये या लेणीला ऐतिहासिक वारसा लाभला. वेरूळ लेणीमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील लेण्यांचा अनोखा संगम असल्याने इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.