बीट आणि गाजरचा ज्युस आहे शरीरासाठी वरदान; जाणून घ्या फायदे

गाजर आणि बीट दोन अशा भाज्या आहेत ज्या पोषक तत्वांचा खजिना मानल्या जातात. त्यांचा रस पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते

    उन्हाळ्याची चाहूल लागताच ज्युस आणि पेय घेण्याची इच्छा सर्वाची होते. यामध्येच ते ज्युस जर आरोग्यदायी असतील तर ते शरीरासाठी आणखी उपयुक्त ठरतात. गाजर आणि बीट दोन अशा भाज्या आहेत ज्या पोषक तत्वांचा खजिना मानल्या जातात. त्यांचा रस पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यांचा रस पिल्याने रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते, ज्यामुळे रोगांपासून बचाव होतो. गाजर आणि बीट पासून बनवलेल्या रसाचे फायदे आणि ते कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

    गाजर आणि बीटपासून बनविलेले ज्युस एक प्रकारचे आंबवलेले प्रोबायोटिक पेय आहे, जे आरोग्यासाठी परिपूर्ण आणि उत्कृष्ट आहे. गाजर आणि बीट मध्ये भरपूर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच त्याचे ज्युस घेणे शरीरासाठी चांगले असते. ज्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते आणि आतड्याचे आरोग्य निरोगी ठेवणे सोपे जाते. यामुळे आतड्यांचे आरोग्य राखण्यास उपयुक्त ठरते.  गाजर आणि बीटपासून बनवलेला रस आपल्या शरीरात होणारे अनेक आजार दूर करण्यास मदत करते.

    गाजरात बीटामध्ये कॅरोटीन आणि जीवनसत्त्व ए, सी, के आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर बीटरूट मध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्व -सी भरपूर प्रमाणात असते. त्यापासून बनवलेला रस हा पोषक तत्वांचा खजिना आहेत. याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे आपण बदलते हवामान किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळतो आणि आजारी पडत नाही. हे पेय पिल्याने आपली पचनसंस्था मजबूत होते, ज्यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील जळजळ कमी करणे सोपे होते. तसेच काही दिवस याचे सतत सेवन केल्याने लघवीचा संसर्गही दूर होतो. असे अनेकांगी उपयुक्त असलेले गाजर बीट याचा ज्युस तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की घ्या.