‘हा’ सरबत प्याल तर पित्त होईल कायमचं दूर, वाचा त्याचे चमत्कारीक फायदे

  इतर कोणत्याही कृत्रिमरीत्या थंडगार केलेल्या शीतपेयांपेक्षा कोकम सरबताचे गुण आणि फायदे निश्चितच जास्त आहेत. कोकम उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोकणच्या वैभवातही भर पडेल (Benefits of Kokam Juice).

  पित्तावर प्रभावी

  आजकाल पित्तखड्यांच्या ऑपरेशनसाठी किमान 60 ते 89 हजार रुपये ऑपरेशन, हॉस्पिटलमधील वास्तव्य, औषधोपचार इत्यादींसाठी खर्च होतात. शरीरात नियमित पद्धतीने पित्त निर्माण होते आणि त्याचा चयापचय या शरीरांतर्गत व्यवहाराशी संबंध येतो. खाण्यापिण्याच्या नको त्या सवयी, तेलकट, मांसाहारी पदार्थ, मसालेदार पदार्थ, आपल्या कुवतीपेक्षा जास्त खाणे किंवा अनेक अनियमित पद्धतींचा वापर इत्यादी कारणांने पित्ताची अतिरिक्त निर्मिती होते. आनुवंशिकता असेल तर पित्तनिर्मितीस चालना मिळते. आमचा या व्याधीशी संबंध आल्याने आता त्याची विशेषत्वाने जाणीव झाली. परंतु याच पित्त विकारावर अतिशय गुणकारी असे औषधी फळ आहे ते म्हणजे कोकणातील रातांबा ऊर्फ कोकम.

  दाह कमी होतो

  नियमित कोकम सरबताचे प्राशन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते. आता सुरू होणाऱ्या उष्ण दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे. रातांब्याचे झाड बहुगुणी आहे, म्हणूनच कोकणी आहारात कोकमांच्या सोलांचा म्हणजे आमसुलांचा वापर होतो. तसंच कोकमाच्या आगळाचाही स्वयंपाकात वापर केला जातो. कोकमामुळे अंगात शीतलता आणि माधुर्य वाढून जळजळ, दाह कमी होतो. जगाच्या बाजारात हजारो कोटी रुपयांची कृत्रिम शीतपेयांची निरुपयोगी उत्पादने खपतात.

  कोकम सरबत हे अशा कृत्रिम शीतपेयांना योग्य प्रतिस्पर्धी ठरू शकते. कोकणात कोकमाचे उत्पादन वाढवल्यास त्याचा कोकण प्रांताला फायदा होईल. कोकणातील रातांबा या पिकाचे योग्य प्रकारे जर संवर्धन झाले तर जगाला ते वरदान ठरणार आहे. पित्त विकाराने ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी कोकम आणि कोकमापासून बनवलेली उत्पादने फायदेशीर आहेत.

  रातांब्याची हिरवी फळे काठीने झोडून जमिनीवर पाडतात आणि ती कापून त्यात मीठ घालून वाळवतात. त्याऐवजी पिकलेली रातांबा फळे झाडावरच तयार झाली तर ती अधिक मौल्यवान ठरतील. दैनंदिन आहारात कोकम सोलांचा वापर हवा. कोकमाच्या बियांपासून बनवलेल्या तेलाचाही वापर डोळ्यांची आणि तळपायांची जळजळ कमी करण्यासाठी होतो. पित्त विकाराचे नियंत्रण करण्याची शक्ती कोकमात आहे.