
लाल तांदळात कमी कॅलरीज असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे, लाल तांदळात फायबर असते, जे पोट भरते आणि भूक कमी करते.
लाल तांदळाचे फायदे : भारतामध्ये तांदळाचे अनेक जाती आहेत. यापैकी सर्वात प्रसिद्ध पांढरा आणि तपकिरी तांदूळ आहे. परंतु लाल तांदळाबद्दल फार कमी लोकांनी ऐकलं असेल. आज आम्ही तुम्हाला लाल तांदळाबद्दल सविस्तर सांगणार आहोत. या तांदळाचा रंग गडद लाल आहे. लोह, झिंक, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्ससारखी खनिजे लाल तांदळात मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. मधुमेह, कॅन्सर, अॅनिमिया यांसारख्या आजारांमध्ये लाल तांदूळ फायदेशीर मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात लाल तांदळाचा समावेश करू शकता.
वजन कमी करण्यास होते मदत :
लाल तांदळात कमी कॅलरीज असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे, लाल तांदळात फायबर असते, जे पोट भरते आणि भूक कमी करते. लाल तांदूळ ग्लायसेमिक इंडेक्स कमी करून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. याशिवाय लाल तांदळात प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.या सर्व कारणांमुळे लाल तांदूळ वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो.
मधुमेहासाठी फायदेशीर :
लाल तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे लाल तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. लाल भात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
हाडांसाठी फायदेशीर :
लाल तांदळात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळतात, जे हाडांसाठी अत्यंत महत्वाचे पोषक असतात. लाल भात खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये आढळणारे पोषक तत्व हाडे तुटण्यापासून आणि कमकुवत होण्यापासून रोखतात. लाल भात खाल्ल्याने सांधेदुखी, हाडांची झीज यांसारखे आजार टाळता येतात.हाडांसाठी खूप फायदेशीर आहे.
हृदयविकाराचा धोका कमी होतो :
जर कोणाला हृदयविकार असेल तर त्याच्यासाठी लाल तांदूळ खूप फायदेशीर आहे. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. लाल भात खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.हृदयाच्या रुग्णांनी लाल तांदळाचे सेवन करावे.