
कारल्याच्या बियांमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. इतकेच नाही तर कारल्याच्या बिया त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
कारल्याचे फेस मास्क : कारले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे आपण लहान पानापासून ऐकत आलो आहोत. डॉक्टर नेहमी मधुमेही रुग्णांना कारले खाण्याचा सल्ला देत असतात. वास्तविक, कारल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कारल्यामध्येच नव्हे तर त्याच्या बियांमध्येही अनेक फायदे दडलेले आहेत ते सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि खनिजे आढळतात. हे सर्व त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. याच्या बिया बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि डाग काही दिवसातच निघून जातात. आज आपण कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने चमक आणि तजेदारपणा येतो. याशिवाय चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. कारल्याच्या बियांमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. इतकेच नाही तर कारल्याच्या बिया त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. या बिया त्वचेला तरूण तर ठेवतातच शिवाय ती निरोगी आणि सुंदर बनवतात.
बनवा कारल्याचा फेस मास्क घराच्या घरी –
कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला २ चमचे कारल्याच्या बिया, १ चमचा मध आणि १ चमचा दही लागेल. कारल्याच्या बियापासून फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम हे बिया चांगले धुवा. त्यानंतर ते बारीक करून घ्या. यानंतर त्यात मध आणि थोडं दही घालून मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे २० मिनिटे राहू द्या. काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा लावा. अशा प्रकारे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हा पॅक स्टोअर करू शकता. कारल्याच्या बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमची त्वचा हायड्रेट ठेवते. बियांमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेच्या पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करतात. हे वृद्धत्व देखील प्रतिबंधित करते. कारल्याच्या बियापासून बनवलेला फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करेल. हा फेसपॅक लावल्याने तुमची त्वचा सुंदर होईल.