लेमन टी शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर

तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी लेमन टी खूप फायदेशीर आहे. हा रिफ्रेशिंग चहा तुमचा मूड काही वेळातच बरा करू शकतो.

  ब्लॅक टी : जगभरामध्ये चहा हा प्रचंड लोकप्रिय आहे. विशेषतः आपल्या देशामध्ये चहाचे शौकीन तर फार आहेत. भारतामध्ये सगळ्यांचीच दिवसाची सुरुवात ही चहाने होते. काही लोकांना चहाचे इतके व्यसन असते की त्यांची सकाळ चहाशिवाय सुरू होत नाही. मात्र, जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चहाच्या जागी लेमन टी घेऊ शकता. तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी लेमन टी खूप फायदेशीर आहे. हा रिफ्रेशिंग चहा तुमचा मूड काही वेळातच बरा करू शकतो. याशिवाय, यामुळेइतर अनेक आरोग्यदायी फायदेह मिळतात. हे फायदे नेमके कोणते याचविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

  त्वचेसाठी फायदेशीर
  लेमन टीमध्ये तुरट गुणधर्म असतात, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्याचे काम करतात. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत, जे मुरुम, डार्क स्पॉट्स आणि एक्जिमाचा प्रभावीपणे सामना करू शकतात, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

  संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण
  हिवाळ्याला हळूहळू सुरुवात झाली आहे. हवामानत तसे बदलही दिसतायत. अशातच अनेकांना सर्दी, खोकला आणि घसादुखी यांसारख्या समस्या जाणवू लागल्या आहेत. अशा वेळी तुम्ही मधाबरोबर लेमन टी प्यायल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. लिंबाच्या अर्कामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स छातीतील रक्तसंचयपासून आराम देऊ शकतात, जे संसर्गजन्य रोगांपासून बरे होण्यास मदत करतात .

  शरीर डिटॉक्सिफाई करण्यास मदत
  लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते, जे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. एक कप लेमन टी प्यायल्याने अन्नाचे पचन करण्यास मदत करते आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.

  हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
  लिंबूमध्ये हेस्पेरिडिन आणि डायओस्मिन सारखे वनस्पती फ्लेव्होनॉइड्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर रोज संध्याकाळी एक कप गरम लेमन टी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

  रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त
  लेमन टी इंसुलिन नियंत्रित करण्यास मदत करते आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध करते. याशिवाय, हा चहा भूक नियंत्रित करतो, ज्यामुळे चयापचय सुधारतो आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.