पिवळी नाही काळी हळद! होय बरोबर ऐकलयं; नावच नाही तर याचे फायदे ऐकनही थक्क व्हाल

हळदीच्या औषधीय गुणांमुळे याला जगभरात मोठी डिमांड आहे. हळदीने इम्यून सिस्टीमला बूस्ट करण्यासोबतच अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. हेच कारण आहे की, एक्सपर्ट्स दररोज काही प्रमाणात याचं सेवन करण्यास सांगतात. हळद केवळ पिवळ्या रंगाची नसते. काळी हळदही आहे(Black Turmeric is a panacea for many ailments).

    पण ही काळ्या आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये असते. काळी हळद सामान्यपणे भारताच्या पूर्वोत्तर आणि मध्य प्रदेशात उगवली जाते. काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. एका संशोधनानुसार, फार कमी लोकांनाच काळ्या हळदीबाबत माहीत आहे.

    ही आयुर्वेदातील महत्वाच्या जडीबुटींपैकी एक आहे. यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळून येतात. ज्यात अ‍ॅंटीफंगल, अ‍ॅंटी अस्थमा, अ‍ॅंटीऑक्सीडेंट, एनाल्जेसिक, लोकोमोटर, डिप्रेसेंट, अ‍ॅंटीकॉन्वेलसेंट, अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी अल्सर आणि मांसपेशींना आराम देणारा प्रभाव, चिंताजनक आणि सीएनएस डिप्रेशन दूर करणारे गुण प्रामुख्याने आढळतात. ज्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

    श्वासासंबंधी आजारांमध्ये काळी हळद फार फायदेशीर असते. यात अ‍ॅंटी इंफ्लेमेट्री गुण आढळून येतात. जे सर्दी, खोकला, अस्थमासारख्या आजारांपासून आराम देतात. याचा वापर तुम्ही पिवळ्या हळदीसारखाच करू शकता.

    मायग्रेनची समस्या जास्तकरून महिलांमध्ये बघायला मिळते. पण हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यात डोक्याच्या मागे एका भागात असह्य वेदना होतात. मायग्रेनने पीडित व्यक्ती मोठा आवाज आणि प्रकाशाने संवेदनशील होतो.

    काळी हळद या समस्येत आराम देऊ शकते. आरामासाठी ताज्या हळदीचा लेप तयार करून कपाळावर लावा. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. अशात काळ्या हळदीतील अ‍ॅंटी इनफ्लेमेट्री गुण आराम देतात.