
नागपूर: बीएचएन वृद्धाश्रम आणि आरोग्य केंद्र (BHN Old Age Home And health Center) हे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक यांच्याकडून एक दशकाहून अधिक काळ व्यावसायिक पद्धतीने चालवले जाणारे आरोग्य केंद्र आणि वृद्धाश्रम आहे. नागपुरातील (Nagpur News) या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची चांगली काळजी घेतली जाते.
येथील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स, परिचरवर्ग, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिक 24 तास आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी सज्ज आहेत. तुमच्या प्रियजनांना सुरक्षित, आरोग्यपूर्ण तसेच आनंदी वाटावे, यासाठी इथे प्रयत्न केले जातात. वातानुकूलित खोल्या, घरगुती जेवण, दैनंदिन वैद्यकीय तपासणी, फिरण्यासाठी उद्यान, मन आणि शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी योगा आणि अन्य सुविधा बीएचएन येथे उपलब्ध आहेत. डिमेन्शिया केअर, अल्झायमर, पार्किन्सन, शस्त्रक्रियेनंतरची काळजी, कर्करोग, अर्धांगवायू, पक्षाघात झालेले आणि अतिदक्षता आवश्यक असलेल्या रुग्णांची काळजी घेणारे तज्ज्ञ डॉक्टर्स इथे सदैव उपलब्ध असतात.