अक्षय्य तृतीयेच्या ‘या’ शुभ मुहूर्तांवर करा खरेदी, ‘अभिजीत’ आणि ‘विकला’ मुहूर्त आहेत खास

अक्षय्य तृतीया संस्कृत शब्द आहे.कोणत्याही गोष्टीचा क्षय किंवा नाश नाही. अनेक लोक या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण यादिवशी खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूचे योग्य ते फळ मिळते.

  अक्षय्य तृतीयेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात अक्षय्य तृतीया सण येतो. अक्षय्य तृतीया हा संस्कृत शब्द आहे. कोणत्याही गोष्टीचा क्षय किंवा नाश नाही. अनेक लोक या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण यादिवशी खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूचे योग्य ते फळ मिळते.या दिवशी नवीन कामाची सुरुवात केल्यानंतर आपल्याला योग्य ते फळ मिळते. ही तारीख कोणतीही वस्तू खरेदी विक्रीसाठी शुभ असल्याने या दिवशी सोनं चांदी, नवीन वस्तू, गाडी, घर इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. लग्न, गृहप्रवेश, नामकरण, नवीन कामाची सुरुवात हे अक्षय्य तृतीयेला केले जाते. तुम्हीसुद्धा अक्षय्य तृतीयेला काही वस्तू किंवा सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला शुभ मुहूर्ताची माहिती सांगणार आहोत.

  अक्षय्य तृतीयेला वस्तू खरेदीचे शुभ मुहूर्त:

  अक्षय्य तृतीयेला तुम्ही तीन प्रहारांमध्ये खरेदी करू शकता. या शुभ मुहूर्तांवर एखाद्या वस्तूची खरेदी केल्यास त्या लोकांना शुभ फळ मिळते. जीवनातील सर्व समस्या संपून जातात.

  सकाळ:
  अभिजित मुहूर्त – सकाळी 11:51 ते दुपारी 12:45 पर्यंत. ही वेळ वस्तू खरेदीसाठी अतिशय शुभ आहे.
  विकला मुहूर्त – सकाळी 11:15 ते 12:15 पर्यंत. वस्तू खरेदीसाठी हा काळ शुभ आहे.

  दुपारची शुभ वेळ:

  ध्रुव मुहूर्त – दुपारी १२:१५ ते १:१५ . यावेळी खरेदी केल्याने व्यक्तीची संपत्ती आणि समृद्धी वाढते.
  फायदेशीर वेळ – 1:15 ते 2:15 पर्यंत. यावेळी खरेदी करणे फायदेशीर परिणाम देते.

  संध्याकाळची शुभ वेळ:
  अमृत मुहूर्त – हा मुहूर्त संध्याकाळी 6:15 वाजता सुरू होईल, जो 7:15 वाजता संपेल. यावेळी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
  सिद्धी मुहूर्त – हा मुहूर्त संध्याकाळी 7:15 पासून सुरू होईल, जो रात्री 8:15 वाजता संपेल. यावेळी खरेदी केल्याने यश मिळते.