
अनेकांना कच्च दूध (milk) प्यायला आवडतं. काही लोक सांगतात की कच्च्या दुधात ताकद असते. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. कच्चं दूध प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते. अन्न (food) आणि औषध प्रशासन, यूएस आरोग्य संरक्षण एजन्सीनुसार, कच्च्या दुधामध्ये (milk) एस्चेरिचिया कोला लिस्टेरिया (Escherichia coli Listeria)आणि साल्मोनेलासारखे (Salmonella)अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात.
लक्षात ठेवा तुम्ही कच्चे दूध (milk) पिऊ नका आणि लहान मुलांना तर अजिबात देऊ नका. कारण त्यांच्यात आरोग्यासंबंधी समस्या उदभवू शकतात. कच्चे दूध प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला विषबाधा (poisoning)देखील होऊ शकते. दुधात (milk) असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीराला (body) हानी पोहोचवू शकतात.
लक्षात ठेवा यामुळे अतिसार, संधिवात आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात. तसेच शरीरातील (body) ऍसिडचे प्रमाण देखील वाढते जे आरोग्यासाठी चांगले नाही.