chandra grahan 2021

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, १९ नोव्हेंबर २०२१ ला असलेलं चंद्रग्रहण(Chandra Grahan) ५८० वर्षांनंतर आलेलं सगळ्यात मोठं आंशिक चंद्रग्रहण असेल. या कार्तिक पौर्णिमेला १९ तारखेला (Chandra Grahan 2021)असलेल्या चंद्रग्रहणाविषयी काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

    वर्ष २०२१ मधलं शेवटचं (Last Lunar Eclipse Of 2021)आणि दुसरं चंद्रग्रहण शुक्रवारी १९ नोव्हेंबरला(Chandra Grahan 2021) आहे. हे चंद्रग्रहण(Lunar Eclipse In November) या शतकातलं सगळ्यात जास्त काळ राहणार चंद्रग्रहण(Chandra Grahan In November) असल्याचं सांगितलं जात आहे.

    ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहणाला वेगळं महत्त्व आहे. धर्मशास्त्रांमध्ये ग्रहण अशुभ मानण्यात आलं आहे. असे मानले जाते की ग्रहणाच्या काळात कोणतंही शुभ कार्य करु नये. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, १९ नोव्हेंबर २०२१ ला असलेलं चंद्रग्रहण ५८० वर्षांनंतर आलेलं सगळ्यात मोठं आंशिक चंद्रग्रहण असेल. या कार्तिक पौर्णिमेला १९ तारखेला असलेल्या चंद्रग्रहणाविषयी काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

    हे चंद्रग्रहण कुठे आणि कोणत्या वेळी दिसेल हे ठिकाण आणि टाईम झोनवर अवलंबून आहे. भारतात चंद्रग्रहणाची वेळ दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांपासून संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांपर्यंत अशी आहे. या आंशिक चंद्रग्रहणाचा कालावधी साधारण ३ तास २९ मिनिटे असा आहे. ज्योतिषांच्या मते उपछाया चंद्रग्रहणामुळे भारतात हे ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाच्या काळातील सूतक पाळण्याची गरज नाही.

    याआधी जास्त कालावधीचं चंद्रग्रहण १८ फेब्रुवारी १४४० ला दिसलं होतं. आता भविष्यात असं चंद्रग्रहण ८ फेब्रुवारी २६६९ मध्ये पाहायला मिळेल. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर जास्त असल्याने आगामी चंद्रग्रहणाचा कालावधी जास्त असेल.
    शुक्रवारी १९ नोव्हेंबरला असणारं चंद्रग्रहण भारतात मणिपूरची राजधानी इंफाळ आणि सीमावर्ती भागात बघता येईल. आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्येही हे चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे. मात्र हे चंद्रग्रहण पूर्ण दिसणार नाही. एक छोट्या रेषेसारख्या आकारात दिसेल.