Saturn Transits 2023
Saturn Transits 2023

Saturn Transits 2023-24 : शनीचे वर्णन कलियुगातील दंडाधिकारी म्हणून केले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि कर्माच्या आधारे फळ देतो. यानुसार, 2023 मध्ये कोणत्या राशीच्या लोकांना शनीने त्रास दिला? जाणून घेऊया.

  Shani Dev : ज्योतिष शास्त्रात शनी (Shani) हा क्रूर आणि न्याय देणारा ग्रह मानला जातो. शनि हा कर्म ग्रह मानला जातो. शनिदेव हे कलियुगाचे न्यायाधीश आहेत आणि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. कर्म घराचा स्वामी शनि आहे, त्यामुळे शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. तेच शनीच्या वाईट प्रभावामुळे नोकरी, व्यवसाय, जीवनात अधोगती होते.

  शनिदेव 2023 ते 2025 पर्यंत एकाच राशीत असणार

  2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. 2023 मध्ये शनिदेवाची हालचाल नेमकी कधी-कधी बदलली आणि कोणत्या राशीच्या लोकांना या वर्षी शनिदेवाने त्रास दिला? तसेच, पुढील वर्ष हे केवळ शनिचे असणार आहे. जाणून घेऊया यावरील सविस्तर रिपोर्ट

   

  2023-24 मध्ये शनिची स्थिती

  आपल्या बारा राशींमध्ये तसेच ग्रह मंडलात शनिचे वेगळेच महत्त्व आहे. शनिला न्यायदेवता मानले जाते. चांगल्या कर्माचे उचित फळ देण्यासाठी शनिदेवतेला मानाचे स्थान दिले आहे. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनिला तब्बल अडीच वर्षे लागतात. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केला. 4 नोव्हेंबर 2023 रोजी शनि सरळ चालीत कुंभ राशीत आला. आता 30 मार्च 2025 पर्यंत शनि कुंभ राशीतच राहणार आहे. यानंतर बृहस्पति मीन राशीत प्रवेश करेल. या संपूर्ण वर्षात शनिदेवाने काही राशींच्या लोकांवर वाईट नजर ठेवली आहे. परंतु, शनि कर्मप्रधान असल्याने जे कष्ट करणार प्रामाणिकपणे मेहनत करणार त्यांना शनि चांगलेच फळ देणार आहे.

   

  शनिच्या प्रभावामुळे 2023 वर्ष या राशींसाठी ठरले फायद्याचे

  2023 मध्ये शनिच्या या स्थितीमुळे काही राशींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. शनिच्या प्रत्यक्ष चालीमुळे 3 राशीच्या लोकांच्या जीवनात वर्षभर गोंधळाचं वातावरण होतं. या वर्षी कन्या (Virgo), तूळ (Libra) आणि मकर (Capricorn) राशीच्या लोकांना शनिच्या वाईट नजरेचा त्रास झाला. या वर्षात या 3 राशींच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. या राशीच्या लोकांना नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. या तिन्ही राशीचे लोक 2023 मध्ये मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहिले. तर कुंभ, धनु, सिंह राशीला शनिच्या बदलेल्या चालीचा चांगलाच फायदा झाल्याचे पाहायला मिळाले.

  या राशींना शनिच्या बदलत्या चालीने नुकसान

  शनीच्या वाईट नजरेमुळे कामात अडथळे, अपयश, आर्थिक संकट इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागतं. या संपूर्ण वर्षात कन्या (Virgo), तूळ (Libra) आणि मकर (Capricorn) राशीच्या लोकांना कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. या राशीच्या लोकांचा बराच काळ चांगला गेला नाही. कन्या (Virgo), तूळ (Libra) आणि मकर (Capricorn) राशीच्या काही लोकांना 2023 मध्ये मोठ्या आर्थिक नुकसानालाही सामोरं जावं लागलं होतं. वडिलोपार्जित मालमत्तेबाबतही काही समस्यांना सामोरं जावं लागलं. 2024 च्या सुरुवातीला देखील या राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.