
दालचिनीचे सेवन दररोज १ ते २ ग्रॅम या प्रमाणात करावे. हे चहा, कॉफी, सॅलड किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेतले जाऊ शकते.
दालचिनीचे फायदे : दालचिनी हा एक प्राचीन मसाला आहे आणि दालचिनी हा पदार्थ आयर्वेदिक औषध आणि अनेक आरोग्य फायद्यांशी जोडलेले आहे. त्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, पचन समस्या इत्यादीसारख्या अनेक रोगांशी लढण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते. दालचिनीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराला या आजारांपासून वाचवतात. दालचिनीचे सेवन दररोज १ ते २ ग्रॅम या प्रमाणात करावे. हे चहा, कॉफी, सॅलड किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेतले जाऊ शकते. परंतु जर १ ते २ ग्राम या प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने ते हानिकारक असू शकते आज आम्ही तुम्हाला दालचिनीचे फायदे सांगणार आहोत.
चिडचिड आणि सूज मध्ये आराम :
जर आपली सातत्याने चिडचिड होत असेल आणि आपल्या शरीराला सूज असेल तर आपल्याला दालचिनी विशेषतः फायदेशीर आहे. दालचिनी हे शरीरामधील जळजळ कमी करते कारण त्यांच्या पुनर्संचयित आणि शामक गुणधर्मांमुळे जळजळीशी संबंधित समस्यांमध्ये, दालचिनीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेची जळजळ आणि इतर संबंधित समस्यांमध्ये आराम देऊ शकतात.
पाचक :
दालचिनी हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे त्याचबरोबर जेवतील सुद्धा महतवाचा पदार्थ आहे. जे पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म पाचन समस्या जसे की गॅस, अपचन आणि पोटदुखी दूर करण्यास मदत करतात.
हृदयरोग :
आपल्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरली जाणारी दालचिनी केवळ चवीसाठीच नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे हृदयविकाराच्या जोखीम घटकांना कमी करण्यास मदत करतात. इतकेच काय, ते LDL (खराब) कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि ट्रायग्लिसरायड्स कमी करण्यास मदत करू शकते, हे दोन्ही हृदयविकाराचे प्रमुख जोखीम घटक आहेत.
रक्तातील साखरेचे नियंत्रण :
दालचिनी शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते, ज्यामुळे शरीराला रक्तातील साखरेचा योग्य वापर करता येतो. याव्यतिरिक्त, दालचिनी कार्बोहायड्रेट पचनाची प्रक्रिया मंद करून खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ रोखू शकते. हे सर्व गुणधर्म मधुमेहाच्या व्यवस्थापनात आणि नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत, ज्यावरून असे समजते की रक्तातील साखरेचे परिसंचरण संतुलित ठेवण्यात दालचिनी महत्त्वाची भूमिका बजावते.