चमकदार आणि मजबूत केसांसाठी कॉफी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

कॉफीपासून बनवलेला हेअर मास्क केसांसाठी फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी कॉफीचा वापर केला जातो. कॉफी केसांच्या मुळांना आधार देते.

  उन्हाळा किंवा इतर ऋतूंमध्ये महिला आणि पुरुषांना केसांसंबंधित समस्या जाणवतात. सतत केस गळणे, कोंडा, विनाकारण केस तुटणे यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. केसांच्या वाढीसाठी कॉफी फायदेशीर असते हे अनेकांना माहित नाही. कॉफीपासून बनवलेला हेअर मास्क केसांसाठी फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी कॉफीचा वापर केला जातो. कॉफी केसांच्या मुळांना आधार देते. तसेच केस धुवण्यासाठी कॉफीचा वापर केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. टाळूचा रक्तप्रवाह चांगला होतो, खडबडीत केस मऊ होणे, कोरड्या केसांना चमक येते, एकदा काळे केस काळे होतात आणि केस तुटण्याची समस्या कमी होत जाते.

  कॉफी हेअर मास्क:

  केसांची मूळ कमकुवत असतील तर कॉफी हेअर मास्क चांगला प्रभाव दाखवतो. हेअर मास्क तयार करण्यासाठी एका अंड्यातील पिवळ बलक एक चमचा कॉफी आणि मीठ मध्ये मिसळा.त्यानंतर ही पेस्ट केसांवर लावा आणि तासभर धरून ठेवा आणि नंतर केस धुवा. केस मऊ होतात आणि खराब झालेले केस दुरुस्त होण्यास मदत होते.कॉफीपासून बनवलेला हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावल्याने केसांसंबंधित अनेक समस्या दूर होतात.

  नारळाचे तेल आणि कॉफी:

  नारळाचे तेल आणि कॉफी केसांना लावल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो.ज्यांना केस गळती किंवा कोंड्याचा त्रास अशांनी नारळाचे तेल आणि कॉफी लावल्याने कोंडा कमी होतो. एक चमचा नारळ तेलामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर केसांना मिक्स करून केसांना लावा. त्यानंतर ते अर्धा तास तसेच राहूद्या. अर्धा तास झाल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे केसांना हेअर स्पा केल्यासारखी शाईन येईल.

  केसांना कॉफी लावण्याचे फायदे:

  • केसांना कॉफी लावल्याने केस चमकदार आणि ग्लोईंग दिसतात. तसेच केसांची मुळे मजबूत होण्यासाठी मदत होते.
  • कॉफीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असते ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन केस चमकदार दिसतात.
  • कॉफी टाळूवर लावल्याने रक्त परिसंचरण सुधारते. पोषक तत्वांना केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. यामुळे केसांची जलद गतीने वाढ होते.
  • कॉफी वापरल्याने टाळूचे डिटॉक्सिफाईंग होण्यास मदत होते. यामुळे टाळूवरील पीएच पातळीचा समतोल राखता येतो. केस गळती कमी होऊन केसांची वाढ होते.