pre implantation

वारंवार गर्भपात होत असेल तर गर्भधारणेचे नुकसान रोखण्यासाठी नक्की काय करावे याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जाणून घ्या. 

  कुटुंब सुरू करण्याचा किंवा वाढवण्याचा विचार करणाऱ्या जोडप्यांसाठी वारंवार येणारा गर्भपाताचा अनुभव भावनिकदृष्ट्या त्रासदायक असू शकतो. वारंवार होणारी गर्भाची हानी ज्याची व्याख्या दोन किंवा अधिक सलग गर्भपात होण्याची घटना म्हणून केली जाते, गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या अंदाजे 1-2% जोडप्यांच्या बाबत असे घडते. गर्भपाताची, क्रोमोसोमल अडचणी, गर्भाशय विषयक अडचणी, हार्मोनल असंतुलन आणि मातेच्या  आरोग्याशी संबंधित समस्या अशी विविध कारणे असू शकतात.  प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्ट  (पीजीटी) हा गर्भधारणेचे नुकसान रोखू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी एक आशादायक पर्याय आहे. न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन येथील वरीष्ठ प्रजनन जीनोमिक्स शास्त्रज्ञ डॉ. शिव मुरारका, यांचा सल्ला

  वाचा – https://www.navarashtra.com/lifestyle/mothers-day-special-heart-health-to-hormonal-balance-blood-tests-every-mom-should-do-531732/

  PGT म्हणजे काय?

  पीजीटी, ज्याला प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (पीजीडी) किंवा प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग (पीजीएस) म्हणूनही ओळखले जाते, हे एक प्रजनन तंत्रज्ञान आहे जे इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) दरम्यान गर्भाशयात रोपण करण्यापूर्वी भ्रूणांच्या जनुकीय आरोग्याच्या तपासणीसाठी वापरले जाते. प्रक्रियेमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  IVF Process: प्रक्रियेची सुरूवात अंडाशय उत्तेजित होऊन अंड्याच्या पुनर्प्राप्तीसह सुरू होते, त्यानंतर पुनर्प्राप्त केलेल्या अंडयाचे प्रयोगशाळेच्या सेटिंगमध्ये शुक्राणूंसह फलन केले जाते.

  गर्भाचा विकास: फलित अंडी किंवा भ्रूण, ब्लास्टोसिस्ट अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत काही दिवस प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते, सामान्यत: गर्भाधारणे नंतर सुमारे पाच ते सात दिवस.

  भ्रूण बायोप्सी: साधारणपणे वाढ सुरू झाल्याच्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी जनुकीय विश्लेषणासाठी प्रत्येक भ्रूणातून काही पेशी काळजीपूर्वक काढून घेतल्या जातात.

  जनुकीय विश्लेषण: बायोप्सी केलेल्या पेशीची, गुणसूत्रातील असामान्यपणा, जनुकीय बदल किंवा इतर जनुकीय दोषांचे मूल्यांकन करण्यासाठी जनुकीय चाचणी घेतात. पीजीटी जनुकीय विकारांचा सखोल अभ्यास करू शकते, ज्यामध्ये एन्युप्लॉइडी (असामान्य गुणसूत्र संख्या), एकल जनुक विकार आणि संरचनात्मक गुणसूत्र पुनर्रचना यांचा समावेश आहे.

  भ्रूण निवड: जनुकीय विश्लेषणानुसार, भ्रूण प्रत्यारोपण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेमध्ये गर्भाशयात प्रत्यारोपण करण्यासाठी सहज लक्षात न येणाऱ्या जनुकीय असमान्यता नसलेले भ्रूण निवडले जातात.

  इम्प्लांटेशन आणि गर्भधारणा: निवडलेले भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात, जिथे ते रोपण होऊन गर्भधारणेत विकसित होऊ शकतात.

  वारंवार गर्भपात होत असलेल्या जोडप्यांना पीजीटी मुळे अनेक फायदे होऊ शकतात:

  जनुकीय तपासणी: पीजीटी मध्ये भ्रूणांची गुणसूत्रातील असामान्यपणा आणि जनुकीय  विकारांसाठी सखोल तपासणी करता येते, ज्यामुळे जनुकीय  कारणांमुळे गर्भपात होण्याचा धोका कमी होतो.

  गर्भधारणेच्या परिणामातील सुधारणा: प्रत्यारोपणासाठी क्रोमोसोमली सामान्य भ्रूण निवडून, पीजीटी यशस्वी रोपण आणि चालू गर्भधारणेची शक्यता वाढवू शकते, पर्यायाने गर्भपात होण्याचा धोका कमी करते.

  मनःशांती: वारंवार गर्भपात होत असलेल्या जोडप्यांना, जनुकीय कारणांमुळे पुढील गर्भपात होण्याचा धोका कमी करून पीजीटी यशस्वी गर्भधारणेची खात्री देते.

  कुटुंब नियोजन: अशी जोडपी ज्यांच्या संततीला जनुकीय विकार होण्याचा धोका असतो अशा  जोडप्यांसाठी देखील पीजीटी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे कुटुंब नियोजनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊन ते आनुवंशिक विकाराचा संभाव्य प्रसार रोखू शकतात.

  तथापि, हे मान्य करणे आवश्यक आहे की वारंवार गर्भपात होत असलेल्या सर्व जोडप्यांसाठी पीजीटी योग्य किंवा प्रभावी असू शकत नाही. वय, अंडाशय  क्षमता , शुक्राणूंची गुणवत्ता आणि अंतर्निहित प्रजनन समस्या यासारखे घटक आयव्हीएफ आणि पीजीटी च्या यशावर परिणाम करू शकतात. याव्यतिरिक्त, पीजीटी गर्भपाताचा धोका पूर्णपणे काढून टाकत नाही, कारण इतर गैरजनुकीय  घटक अजूनही गर्भधारणेच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकतात.

  जनुकीय  कारणांमुळे वारंवार गर्भपात होत असलेल्या जोडप्यांना प्रीइम्प्लांटेशन जनुकीय  चाचणी एक आशादायक पर्याय देते. इम्प्लांटेशनपूर्वी क्रोमोसोमल असमान्यता आणि जनुकीय  विकारांसाठी भ्रूणांची तपासणी करून, पीजीटी गर्भपात होण्याचा धोका कमी करण्यास आणि यशस्वी गर्भधारणेची शक्यता सुधारण्यास मदत करू शकते. तथापि, वारंवार होणारी गर्भधारणा रोखू पाहणाऱ्या जोडप्यांसाठी पीजीटी हा एक योग्य आणि फायदेशीर पर्याय आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी वैयक्तिक समुपदेशन आणि जननक्षमता मूल्यमापन आवश्यक आहे.