घरामध्ये सतत भांडण, वाद; मग ‘हे’ वास्तुशास्त्राचे उपाय करा…

    घरगुती वाद हे मानसिक तणावाचे माठे कारण आहे. घरातील वाद वाढल्याने सगळ्याच लोकांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतं.

    आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी राहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी घरातील सर्व गोष्टी वास्तुशास्त्रानुसार (architecture)असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नवीन घर (news home) बांधतानाच नेहमी वास्तुशास्त्र लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घराची वास्तू योग्य नसल्यामुळे घरातील भांडणे (arguments) आणि कलह सतत वाढत जातात. याशिवाय घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम (Vastu Tips) होतो.

    आपण सर्वजण पूजेत कापूर वापरतो, परंतु घरातील वास्तुदोष दूर करण्यातही कापूर खूप मदत करू शकतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपात कापूर बुडवून पितळेच्या भांड्यात जाळावा. असे केल्याने घरात शांतता राहते आणि कलह/भांडणे होत नाहीत. आठवड्यातून कोणत्याही दिवशी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवला तर घरातील शांतता कायम राहते.

    घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावावा. याशिवाय घरात हनुमानजींसमोर अष्टगंध जाळून त्याचा सुगंध घरभर पसरवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक उर्जा वाहू लागेल आणि घरात सुख-शांती नांदेल.

    घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठीही आपण केशर वापरू शकता. यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर केशर मिसळून आंघोळ करावी. यानंतर घरातील मंदिरात पूजापाठ करून केशराचा टिळा लावावा, केशराचे दूध प्यायल्याने घरात शांतता आणि सौहार्द कायम राहते.