
भारत बायोटेकने (Bharat Biotech) मुलांवर कोवक्सिनच्या (Covaxin) तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देखील पूर्ण केली आहे. पुढील आठवड्यात ती तिसऱ्या टप्प्यातील डेटा डीजीसीआय(DGCI)कडे सोपवेल, असे कंपनीने म्हटले आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील डेटाचे विश्लेषण (Analysis) केले जात आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असतानाच दरम्यान, देशातील १२-१८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण पुढील महिन्यात सुरू होईल. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हा अहवाल दिला आहे. यानुसार, कॅडिला हेल्थकेअर पुढील महिन्यात मुलांची झीकोव्ह-डी लस सुरू करणार आहे. त्याच्या आणीबाणीच्या वापराला गेल्या महिन्यात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने मंजुरी दिली होती. रॉयटर्सच्या अहवालानुसार, झायडस कॅडिला ऑक्टोबरपासून दरमहा १० दशलक्ष डोस बनवण्यास सुरुवात करेल.
कोवाक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणीही झाली पूर्ण
दुसरीकडे, भारत बायोटेकने मुलांवर कोवाक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देखील पूर्ण केली आहे. पुढील आठवड्यात ती तिसऱ्या टप्प्यातील डेटा डीजीसीआयकडे सोपवेल, असे कंपनीने म्हटले आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील डेटाचे विश्लेषण केले जात आहे. त्याच वेळी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया २ ते १२ वर्षांच्या मुलांवर कोवावॅक्सच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देखील घेत आहे.
गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांना मिळणार सर्वात आधी लाभ मिळू शकतो
कोविड -१९ च्या लसीकरणाबाबत सरकारला सल्ला देणाऱ्या समितीने असे सुचवले होते की सुरुवातीला गंभीर आजार असलेल्या १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करावे. समितीने म्हटले होते की, देशात ४० कोटी मुले आहेत आणि जर सर्वांचे लसीकरण सुरू झाले तर आधीच सुरू असलेल्या १८+ च्यालसीकरणावर परिणाम होईल. समितीचे अध्यक्ष एन के अरोरा म्हणाले होते की, पूर्णपणे निरोगी मुलांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. समितीच्या सल्ल्यानुसार, प्रथम त्या मुलांना लसीकरण केले जाईल जे मूत्रपिंड प्रत्यारोपण, जन्मापासून कर्करोग किंवा हृदय संबंधित रोगाने ग्रासलेले आहेत.
मुलांचे लसीकरण करणे का महत्वाचे आहे?
भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशात लवकरात लवकर मुलांना लसीकरण करणे महत्वाचे आहे. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे उदाहरण समोर आहे. मुंबईतील कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग वाढला. दुसरीकडे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग म्हणतात की, मोठ्यांना लस दिल्यानंतर फक्त मुलेच असतील ज्यांना संरक्षण मिळणार नाही. यामुळे, तिसऱ्या लाटेचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.