उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस खराब होतात? मग अशी घ्या केसांची काळजी

गर्मीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाम येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये केसांची आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. घामामुळे केसांमधली आद्रता कमी होत जाते.

  सध्या सगळीकडे कडक उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे.तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या वाढत्या उष्णतेचा त्रास त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये विशेषता त्वचा आणि केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. ऊन, वारा, धूळ, घाम यामुळे केस लगेच खराब आणि चिकट होऊन जातात. गर्मीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाम येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये केसांची आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. घामामुळे केसांमधली आद्रता कमी होत जाते. यामुळे केस कोरडे आणि चिकट होतात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांना हानी पोहचते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसोबतच केसांची काळजी घेणे तितकंच गरजेचे आहे.

  उन्हाळाच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर जात असताना तोंडाला स्कर्फ बांधून गेल्याने केसांचे नुकसान होण्यापासून टाळले जाते. मात्र असे न केल्यास मोठ्या प्रमाणवर केसांचे नुकसान होते. सूर्याच्या किरणांमुळे केसांमधील क्युटिकल नष्ट होते. यामुळे केस तुटू लागतात. तसेच केसांचा रंग देखील हळू हळू उडू लागतो. केस मोठ्या प्रमाणावर खराब होतात. अशावेळी नेमकी केसांची काळजी कशी घेतली पाहिजे चला तर जाणून घेऊया..

  केसांना हेअर मास्क लावणे

  केस गळती किंवा केस कोरडे होणे या समस्येपासून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर तुम्ही केसांना हेअर मास्क लावू शकता. यामुळे केस मऊ आणि चांगले दिसतात. हेअर मास्कमध्ये शीया बटर आणि आर्गन ऑईलसारखे डीप कंडिशनिंग एजंट आढळून येतात. यामुळे केसांना याचा फायदा होतो. केसांना शॅम्पू लावण्याआधी हेअर मास्क केसांना लावल्याने केसांना अनेक फायदे होतात.

  कंडिशनर लावणे

  केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणे गरजेचे आहे. यामुळे कोरडे केस मऊ होतात. केस मुलायम होण्यास मदत होते. तसेच कंडिशनर लावल्याने केस कोरडे झाल्यानंतर केसातील गुंता कमी होतो आणि केस सुंदर दिसू लागतात. केसांना चांगले पोषण मिळते. केसांना कंडिशनर लावल्यामुळे केसगळती आणि केसांमध्ये फाटे फुटणे कमी होते.

  मोठ्या कंगव्याचा वापर करणे

  केस विचारताना नेहमी मोठ्या कंगव्याचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे केस कमी तुटतात. केस विचारण्याआधी केसांना हेअर सिरम लावणे गरजेचे आहे. ओल्या केसांवर कधीही कंगवा फिरवू नये यामुळे केस जास्त प्रमाणात तुटतात. केस संपूर्ण सुकल्यानंतरच केस विंचरले पाहिजेत.