dating romance women are more attractive to these type of men nrvb

तज्ज्ञांच्या मते, स्वत:हून अधिक चांगलं दिसणाऱ्या लोकांच्या मनात शंकायुक्त भीती असते आपल्या पार्टनरचं (partner) बाहेर कुठे अफेयर (affair) तर नाही ना तर मी कमी सुंदर (beautiful) दिसत असले तरी मला याहून चांगला पार्टनरही मिळाला असता.

महिला आणि पुरुष एकमेकांकडे का आकर्षित होतात, ही गोष्ट अजून वैज्ञानिकांच्याही समजण्यापलीकडची आहे. तथापि, संशोधन, अभ्यास आणि काही प्रयोगांच्या माध्यमातून काही प्रमाणात जाणून घेण्यात यश मिळालं आहे. हा सारा अभ्यास आणि संशोधन असंच सांगत की, पुरुषांकडे असं कोणतं कौशल्य असतं ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात.

फ्लर्ट करणारे पुरुष:

अमेरिकेतल्या रटगर्स विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रसिद्ध लेखिका हेलेन फिशर यांच्या मते, आपलं कौतुक करणाऱ्या महिला अशा पुरुषांकडे पटकन आकर्षित होतात. सायकोलॉजी टुडे पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत हेलेन म्हणतात, आपलं कौतुक कोल्यावर महिला गोड हसतात, लाजतात आणि अशा पुरुषांच्या बोलण्याकडे त्या अधिक लक्ष देतात. अधिकाधिक महिलांना पुरुषांनी त्याच्यासोबत फ्लर्ट केलेलं आवडतं.

स्वत:च्या व्यतिमत्त्वाशी मिळते-जुळते असणारे पुरुष :

महिला अशा पुरुषांकडे पटकन आकर्षित होतात जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळते-जुळते असतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या संशोधकांनी एका ऑनलाइन डेटिंग साइटवर ६० पुरुष आणि ६० महिलांचा अभ्यास केला. अभ्यासात सहभागी झालेल्या या लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळतं-जुळतं असणाऱ्या लोकांमध्ये इंटरेस्ट असल्याचं सांगितलं. तज्ज्ञांच्या मते, स्वत:हून अधिक चांगलं दिसणाऱ्या लोकांच्या मनात शंकायुक्त भीती असते आपल्या पार्टनरचं बाहेर कुठे अफेयर तर नाही ना तर मी कमी सुंदर दिसत असले तरी मला याहून चांगला पार्टनरही मिळाला असता.

वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होणं :

२०१० मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं स्पष्ट झालं आहे की, महिला आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात. ही गोष्ट विशेषत: कमावणाऱ्या महिलांना जास्त लागू पडते UK तील डंडी विद्यापीठातील प्राध्यापक आणि लेखिका फह्याना मूर यांच्या मते, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिला आत्मविश्वासाने पार्टनरची निवड करतात आणि प्रभावशाली आणि वयाने मोठ्या पुरुषांना अधिक पसंती देतात.

थोडी दाढी ठेवणारे पुरुष :

न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील १७७ पुरुष आणि ३५१ महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, अधिकाधिक महिलांनी दाढीच्या लांबीनुसार पुरुषांमध्ये स्वारस्य असल्याचे सांगितले. महिला अशा पुरुषांकडे अधिक होताना दिसल्या ज्यांची दाढी थोडीच वाढली आहे. थोडीशी दाढी ठेवणारे पुरुष परिपक्व असतात, महिला अशा पुरुषांना अधिक पसंती देतात.

सर्वसाधारण शरीरयष्टी असलेले पुरुष :

२८६ महिलांवर कॅलिफोर्निया विद्यापीठात केलेल्या अभ्यासात असं निष्पन्न झालं आहे की, महिलांना सर्वसाधारण शरीरयष्टी असलेले पुरुष अधिक आवडतात. या महिलांना काही शर्टलेस पुरुषांचेही फोटो दाखवण्यात आले. या महिलांनी पिळदार शरीर असलेल्या पुरुषांना काही काळासाठी आणि सर्वसाधारण शरीरयष्टी असलेल्या पुरुषांना चिरंतर पार्टनरच्या रुपात स्वीकारणार असल्याचे नमूद केले.

लाल कपडे घालणारे पुरुष :

चीन, इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेतील लोकांवर २०१०मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार महिला लाल रंगाचे कपडे घालणाऱ्या पुरुषांकडे सर्वाधिक आकर्षित होतात. संशोधनासाठी महिलांना लाल रंगातले आणि अन्य रंगाचे कपडे घातलेल्या पुरुषांचे फोटो दाखविले. महिलांनी लाल रंगाचा शर्ट- टी शर्ट घालणाऱ्या पुरुषांकडे अधिक आकर्षित होत असल्याचे स्पष्ट केले.

हसवणारे पुरुष :

अनेक अभ्यांसातून हे सिद्ध झालं आहे की, महिला अशा पुरुषांकडेही अधिक आकर्षित होतात जे त्यांना हसवतात. उत्तम विनोदबुद्धी असणाऱ्या पुरुषांसोबत महिला लगेच मिसळतात आणि त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधतात.

सुगंधित बॉडी स्प्रे लावणारे :

महिला नवनवीन आणि सुगंधित बॉडी स्प्रे लावणाऱ्या पुरुषांकडेही महिला अधिक आकर्षित होतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार काही पुरुषांना सुगंधित बॉडी स्प्रे तर काही जणांना बिना सुगंधी स्प्रे लावण्यास दिला. अभ्यासातील निष्कर्षात असं स्पष्ट झालं की, महिलांनी सुगंधित बॉडी स्प्रेचा वापर करणाऱ्या पुरुषांमध्ये अधिक आत्मविश्वास आणि अधिक आकर्षक असल्याचं सांगितलं.