dinvishesh 4 august 2023

    ११ जानेवारी घटना

    २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
    २०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना.
    १९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
    १९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
    १९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
    १९६६: गुलजारीलाल नंदा – यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
    १९४२: दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.
    १९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
    १७८७: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

    ११ जानेवारी जन्म

    १९७३: राहुल द्रविड – भारतीय क्रिकेटपटू – पद्म भूषण, पद्मश्री
    १९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
    १९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
    १८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (निधन: २० मार्च १९२५)
    १८५८: श्रीधर पाठक – हिंदी साहित्यिक (निधन: १३ सप्टेंबर १९२६)
    १८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (निधन: ६ जून १८९१)

    ११ जानेवारी निधन

    २००८: यशवंत फडके – मराठी लेखक आणि इतिहास संशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)
    २००८: एडमंड हिलरी – शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)
    १९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
    १९७८: इब्न-ए-इनशा – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (जन्म: १५ जून १९२७)
    १९६६: लालबहादूर शास्त्री – भारताचे २रे पंतप्रधान – भारतरत्न (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)
    १९५४: सर जॉन सायमन – सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)
    १९२८: थॉमस हार्डी – इंग्रजी कादंबरीकार (जन्म: २ जून १८४०)
    १८७४: गेल बोर्डन – आटवलेल्या दुधाचे शोधक (जन्म: ९ नोव्हेंबर १८०१)