दिनविशेष, १९ सप्टेंबर २०२२; आकाश चोप्रा, भारतीय क्रिकेटपटूयांचा जन्मदिवस

  १९ सप्टेंबर घटना

  • २०२१: कुंब्रे व्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेक – ला पाल्माच्या स्पॅनिश कॅनरी बेटावर झाला.
  • २०१७: पुएब्ला भूकंप २०१७ – मेक्सिको मध्ये झालेल्या भूकंपामुळे किमान ३७० लोकांचे निधन तर ६ हजार हुन अधिक लोक जखमी.
  • २००७: युवराजसिंग – हे टी-२० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारे पहिले खेळाडू बनले.
  • २०००: कर्नाम मल्लेश्वरी – यांनी सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवले. असे करणाऱ्या त्या पहिलय भारतीय महिला बनल्या.
  • १९९१: ओत्झी आइसमन – इ.स. पूर्व ३३५० ते ३१०५ दरम्यान जगलेल्या माणसाची नैसर्गिक ममी इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्स पर्वतरांगेमध्ये सापडले.
  • १९८५: मेक्सिको सिटी भूकंप – भूकंपामुळे हजारो लोकांचे निधन तर सुमारे ४०० इमारती उद्ध्वस्त झाल्या.
  • १९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस – देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस – देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९८२: पहिले इमोटीकॉन्स – स्कॉट फॅहलमन यांनी पहिल्यांदाच 🙂 आणि 🙁 या पहिल्या इमोटीकॉन्सचा वापर केला.
  • १९७८: संयुक्त राष्ट्र – सॉलोमन बेटे संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
  • १९७०: ग्लास्टनबरी फेस्टिव्हल – मायकेल इव्हिस यांनी पहिल्यांदा आयोजित केला.
  • १९५७: प्लंबबॉब रेनियर अणुबॉम्ब – हा पहिला आण्विक स्फोट बनला जो संपूर्णपणे भूगर्भात समाविष्ट होता, त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही.
  • १९५७: प्लंबबॉब रेनियर अणुबॉम्ब – हा पहिला आण्विक स्फोट बनला जो संपूर्णपणे भूगर्भात समाविष्ट होता, त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही.
  • १९५०: कोरियन युद्ध – नाम नदीची लढाई: उत्तर कोरियाच्या सैन्याने केलेला हल्ला परतवून लावला.
  • १९४६: युरोप कौन्सिल – स्थापना झाली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – हर्टगेन फॉरेस्टची लढाई: सुरू झाली. पुढे अमेरिकन सैन्याने लढलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक लढाई ठरेल.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – मॉस्को युद्धविराम करार: फिनलंड आणि सोव्हिएत युनियन यांच्यात करारावर स्वाक्षरी झाली.
  • १८९३: न्यूझीलंड – देशामध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १८७०: फ्रँको-प्रुशियन युद्ध – पॅरिस शहाराचा वेढा सुरू झाला. आत्मसमर्पण करण्यापूर्वी हे शहर चार महिन्यांहून अधिक काळ टिकून राहीले.
  • १८६८: ला ग्लोरिओसा क्रांती – स्पेनमध्ये सुरू झाली.१७९९: फ्रेंच क्रांतिकारक युद्ध – बर्गनची लढाई: रशियन आणि ब्रिटिशांविरुद्ध फ्रेंच-डच यांचा विजय.
  • १७७७: अमेरिकन क्रांतिकारक युद्ध – साराटोगाची पहिली लढाई: ब्रिटीश सैन्याने कॉन्टिनेंटल आर्मीवर विजय मिळवला.

   

  १९ सप्टेंबर जन्म

  • १९७७: आकाश चोप्रा – भारतीय क्रिकेटपटू
  • १९६५: सुनिता विल्यम – भारतीय-अमेरिकन अंतराळवीर
  • १९५८ : लकी अली – गायक, अभिनेते व गीतलेखक
  • १९२५: बाबूराव गोखले – नाटककार (निधन: २८ जुलै १९८१)
  • १९१७: अनंतराव कुलकर्णी – कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (निधन: ६ नोव्हेंबर १९९८)
  • १९१२: रुबेन डेव्हीड – भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक – पद्मश्री (निधन: २४ मार्च १९८९)
  • १९११: विल्यम गोल्डिंग – इंग्लिश लेखक – नोबेल पारितोषिक (निधन: १९ जून १९९३)
  • १८६७: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृत पंडित (निधन: ३१ जुलै १९६८)
  • १८३९ : जॉर्ज कॅडबरी – कॅडबरीचे संस्थापक (निधन: २४ ऑक्टोबर १९२२)
  • १५५१ : हेन्री (३रा) – फ्रान्सचा राजा (निधन: २ ऑगस्ट १५८९)

  १९ सप्टेंबर निधन

  • २००७: दत्ता डावजेकर – मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार
  • २००७: डी. डी – संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ
  • २००४: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना – पद्मश्री
  • २००२: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या
  • १९९३: दिनशा के. मेहता – म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी
  • १९९२: ना. रा. शेंडे – साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष
  • १९८७: एनर गेरहर्देसन – नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान
  • १९६३: सर डेव्हिड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार
  • १९४४: गाय गिब्सन – अँग्लो-इंडियन कमांडर आणि पायलट – व्हिक्टोरिया क्रॉस
  • १९३६: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, गांधर्व महाविद्यालयाचे सहसंस्थापक
  • १९२५: सर फ्रान्सिस डार्विन – इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक
  • १८८१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष
  • १७२६: खंडो बल्लाळ चिटणीस – छत्रपती संभाजी वव छत्रपती राजारामस्वीय सहाय्यक
  • १७१०: ओले रोमर – डॅनिश खगोलशास्त्रज्ञ