दिनविशेष २१, ऑक्टोबर २०२२; ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा जन्मदिवस

    २१ ऑक्टोबर घटना – दिनविशेष

    • २००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
    • १९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
    • १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
    • १९८९: जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
    • १९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
    • १९८३: प्रकाशाने निर्वातात १२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
    • १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
    • १९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
    • १९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
    • १९४३: आझाद हिंद सेना – स्थापना
    • १९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
    • १८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
    • १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.

    २१ ऑक्टोबर जन्म – दिनविशेष

    • १९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे माजी पंतप्रधान
    • १९३१: शम्मी कपूर – हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते (निधन: १४ ऑगस्ट २०११)
    • १९२७: फ्रिट्झ विंटरस्टेलर – मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (निधन: १५ सप्टेंबर २०१८)
    • १९२०: गं. ना. कोपरकर – धर्मभास्कर
    • १९१७: राम फाटक – गायक व संगीतकार (निधन: २६ सप्टेंबर २००२)
    • १८८७: कृष्णा सिंह – भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ३१ जानेवारी १९६१)
    • १८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (निधन: १० डिसेंबर १८९६)

    २१ ऑक्टोबर निधन – दिनविशेष

    • २०१२: यश चोप्रा – भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते – पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
    • २०१०: अ. अय्यप्पन – भारतीय कवी आणि अनुवादक (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
    • १९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५)
    • १९९०: प्रभात रंजन सरकार – भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक (जन्म: २१ मे १९२१)
    • १९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – कन्नड कवी – ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ३१ जानेवारी १८९६)
    • १८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५)
    • १४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)