दिनविशेष,२२ सप्टेंबर २०२२; रामकृष्ण बजाज ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती यांचा जन्मदिवस

  २२ सप्टेंबर घटना दिनविशेष

  • १९८०: इराण-इराक युद्ध – इराकने इराणवर हल्ला करून युद्धाची सुरवात.
  • १९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
  • १९४१: युक्रेन होलोकॉस्ट – जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
  • १९३९: दुसरे महायुद्ध – पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.
  • १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
  • १९१४: जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले, त्यात किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.
  • १८९१: फिनलंड – देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला
  • १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक – मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  • १६६०: मराठा साम्राज्य – शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
  • १४९९: स्वित्झर्लंड – बेसलचा तह: स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

  २२ सप्टेंबर जन्म

  • १९२८ : विठ्ठलराव गाडगीळ- भारतीय राजकारणी
  • १९२३ : रामकृष्ण बजाज ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती
  • १९२२: चेन निंग यांग – चिनी भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
  • १९१५ : अनंत माने – मराठी चित्रपट दिग्दर्शक (निधन: ९ मे १९९५)
  • १९०९: विडंबनकार दत्तू बांदेकर – विनोदी लेखक (निधन: ३ ऑक्टोबर १९५९)
  • १८८७: कर्मवीर भाऊराव पाटील थोर शिक्षणतज्ज्ञ – पद्म भूषण (निधन: ९ मे १९५९) –
  • १८८५ : बेन चीफली – ऑस्ट्रेलियाचे १६वे पंतप्रधान १८७८: योशिदा शिगेरू – जपानचे पंतप्रधान
  • १८७६: आंद्रे तार्घी – फ्रांसचे पंतप्रधान
  • १८२९ : टू डुक – व्हिएतनामचा राजा
  • १९६४: नरेंदर थापा – भारतीय फुटबॉलपटू (निधन: ५ ऑगस्ट २०२२)
  • १८६९: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष (निधन: १७ एप्रिल १९४६)
  • १७९१: मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (निधन: २५ ऑगस्ट १८६७)

  २२ सप्टेंबर निधन

  • २०२० : आशालता वाबगावकर भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: २ जुलै १९४१)
  • २०११ : अरिसिदास परेरा केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)
  • २०११ : मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब पद्मश्री (जन्म: ५ जानेवारी १९४१) –
  • २००७: खेळाडू बोडिन्हो – ब्राझिलचे फुटबॉल
  • २००२: विल्यम रोसेनबर्ग – डंकिन डोनट्सचे स्थापक (जन्म: १० जून १९१६)
  • १९९४ : जी. एन. जोशी – भावगीतगायक व संगीतकार (जन्म: ६ एप्रिल १९०९)
  • १९९१ : दुर्गा खोटे मराठी अभिनेत्री (जन्म: १४ जानेवारी १९०५)
  • १९७०: शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)
  • १९६९ : ऍडोल्फो लोपे मटियोस मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
  • १९६५: ओथमर अम्मान जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार (जन्म: २६ मार्च १८७९)
  • १९५६: विल्हेल्म ऑस्टवाल्ड – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २ सप्टेंबर १८५३)
  • १९५२: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग – फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १८६५)
  • १९३३ : कामिनी रॉय – ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)
  • १८२८: शक- झुलु सम्राट
  • १५३९: गुरु नानक देव शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (जन्म: १५ एप्रिल १४६९)
  • १५२० : सलीम (पहिला) – ऑट्टोमन सम्राट