दिनविशेष, ६ ऑगस्ट २०२२; एम. नाईट श्यामलन – भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचा जन्म झाला

    ६ ऑगस्ट घटना

    • २०१०: भारतातीलजम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.
    • १९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.
    • १९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.
    • १९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
    • १९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
    • १९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
    • १९४५: जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.
    • १९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.
    • १९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
    • १९१४: पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

    ६ ऑगस्ट जन्म

    • १९७५: शेखर गवळी – भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) (निधन: १ सप्टेंबर २०२०)
    • १९७०: एम. नाईट श्यामलन – भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक
    • १९६५: विशाल भारद्वाज – भारतीय चित्रपट दिग्दर्शक
    • १९५९: राजेंद्र सिंग – भारतीय पर्यावरणवादी
    • १९२५: योगिनी जोगळेकर – लेखिका (निधन: १ नोव्हेंबर २००५)
    • १९२२: ओमप्रकाश मल्होत्रा – पंजाबचे २५ वे राज्यपाल (निधन: २९ डिसेंबर २०१५)
    • १९००: सीसिल हॉवर्ड ग्रीन – टेक्सास इन्स्ट्रूमेंटचे स्थापक (निधन: ११ एप्रिल २००३)
    • १८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग – पेनिसिलीन औषधाचे निर्माते स्कॉटिश शास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: ११ मार्च १९५५)
    • १८०९: लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (निधन: ६ ऑक्टोबर १८९२)

    ६ऑगस्ट निधन

    • २०१९: सुषमा स्वराज – दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या – पद्म विभूषण (जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)
    • २००१: कुमार चॅटर्जी – भारतीय नौदल प्रमुखआधार
    • २००१: आधार कुमार चॅटर्जी – भारतीय नौदल प्रमुख
    • १९९९: कल्पनाथ राय – राजकीय नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१)
    • १९९७: बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – आसामी साहित्यिक – साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
    • १९९७: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
    • १९९१: शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (जन्म: २६ जून १९१४)
    • १९७८: पोप पॉल (सहावे) – (जन्म: २६ सप्टेंबर १८९७)
    • १९६५: वसंत पवार – संगीतकार
    • १९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)