
लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. हा धोका बदलत्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि कुटुंबात आजार यामुळे वाढत आहे. 'नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन'ने (NCBI) केलेल्या या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. हा धोका बदलत्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि कुटुंबात आजार यामुळे वाढत आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’ने (NCBI) केलेल्या या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. लहान वयात मधुमेह झाल्यामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात.
1 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना या अभ्यासात घेण्यात आले होते. ज्यामध्ये बहुतेक मुलांना पहिल्या प्रकाराचा (टाइप 1) मधुमेह असल्याचे आढळून आले. मुलांना मधुमेह झाला असेल तर घाबरून जाऊ नका. तर त्यांची काळजी घ्या. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. मधुमेह असूनही त्यांच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशस्वी व्यक्तींची उदाहरणे द्या. मुलांना सपूर्ण आहार द्या. जर गोड खाण्याची इच्छा असेल तर मुलांना ग्लुटेन फ्री मफिन्स, डार्क चॉकलेट द्या.
काही वेळा पालकही मधुमेही मुलाशी एक सामान्यपणे वागत नाहीत. त्यांना इतर मुलांबरोबर खेळू देत नाहीत किंवा आजारी असल्याचे सांगून त्यांच्या शारीरिक हालचालींवर बंधने घालतात. त्यामुळे मुलांना खूप एकटेपणा जाणवतो. हळूहळू ते स्वतःला समाजापासून दूर करतात. कोणाशी बोलत नाहीत व गप्प बसू लागतात, त्यांच्या मनात नेहमी नकारात्मक विचार येतात. त्यामुळे ते नैराश्य, तणावाचे शिकार होतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.