मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

मधुमेह झालेल्या रुगणांनी आपल्या आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. असे न केल्यास मधुमेह वाढू शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही ज्यूसबद्दल सांगणार आहोत

  बदलत्या जीवशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. अपुरी झोप, वेळेत न जेवणे, सतत फास्टफूड खाणे यांसारख्या अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडते. आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये मधुमेह (Diabetes) हा आजार मोठ्या प्रमाणावर जाणवते. अगदी लहान वयाच्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मधुमेहाचा त्रास जाणवतो. मधुमेह झाल्यानंतर अनेक पथ्या पाळावी लागतात. पथ्या पळाल्यानंतर साखरेवर नियंत्रण राहते. मधुमेह हा आजार वयाच्या कोणत्याही वर्षी जाणवू लागतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. मधुमेह झालेल्या रुगणांनी आपल्या आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. असे न केल्यास मधुमेह वाढू शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही ज्यूसबद्दल सांगणार आहोत जे पिल्याने मधुमेहाचा त्रास कमी होऊन रक्तातील साखर नियंत्रणात राहील. चला तर पाहुयात कोणते आहेत ज्यूस.

  कारल्याचा ज्यूस

  मधुमेहाचा त्रास असलेल्या रुगणांना कारल्याचा रस दिला जातो. आठवड्यातून तीनदा कारल्याचा रस पिल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कारले ही भाजी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारल्याच्या रसामध्ये असलेल्या गुणकारी पोषक घटकांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.कारल्यामध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्वे आढळून येतात. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात कारल्याचे सेवन करणे गरजचे आहे.

  पालक ज्यूस

  पालक ही भाजी हिरव्या भाज्यांच्या प्रकारामध्ये येते.आपल्या आरोग्यासाठी पालक खूप फायदेशीर आहे. पालकपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मधुमेहाच्या रुगणांनी पालकच रस पिल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. पालकच रस पिल्याने मधुमेह २ चा धोका कमी होतो. त्यामुळे आरोग्यासाठी पालक फायदेशीर आहे. ज्यांना वजन कमी करण्यासाठी सुद्धा पालक फायदेशीर आहे.

  शेवग्याचा ज्यूस

  शेवग्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे, पौष्टीक घटक, लोह , खनिजे यांसारखे सर्व गुणधर्म आढळून येतात. शेवग्याचा रस पिल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते. तसेच शुगर लेवल नियंत्रित राहते.