उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मधुमेहाच्या त्रास असणाऱ्या रुग्णांनी ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढण्याची शक्यता असते. बदलते वातावरण, जीवनशैली यामुळे मधुमेहाचा त्रास अनेकांना जाणवू लागला आहे.

  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढण्याची शक्यता असते. बदलते वातावरण, जीवनशैली यामुळे मधुमेहाचा त्रास अनेकांना जाणवू लागला आहे. मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अतिउष्णता मधुमेहाच्या रुग्णानासाठी त्रासदायक आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे रक्तातील शुगर लेवल वाढू शकते. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  भरपूर पाणी पिणे

  उन्हाळयात घरातून बाहेर जात असताना सोबत पाण्याची बॉटल घेऊन जाणे गरजेचे आहे. कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे बाहेर जात असताना पाण्याची बॉटल घेऊन बाहेर जाणे. दिवसभरातून कमीत कमी ६ ते ७ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. ज्यूस, ताक, फळांचे रस इत्यादींचे जास्तीत जास्त सेवन करणे. यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढत नाही आणि शुगर लेवल नियंत्रणात राहते.

  शुगर लेवल तपासणे

  उन्हाळयाच्या दिवसांमध्ये शुगर लावेल वाढणे किंवा कमी होणे या समस्या सतत जाणवतात. यामुळे अनेक गंभीर आजारांचा सामना देखील करावा लागतो. वाढलेली शुगर लेवल आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे नेहमीच शुगर लेवल तपासात राहावी. शुगर लेवल वाढल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावे.

  योग्य आहार

  उन्हाळ्यात मुख्यता हलके आणि शरीराला पचेल असे जेवण जेवले पाहिजे. या दिवसांमध्ये आहारात फळे, भाज्या, थंड पदार्थ यांचे जास्त सेवन केले पाहिजे. जास्त गोड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटासंबंधित अनेक समस्या जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे पौष्टिक आणि हलका आहार खाणे गरजेचे आहे.

  सुर्यकिरणांपासून बचाव करणे

  कडक उन्हात जास्त वेळ बाहेर फिरणे टाळावे. जास्त वेळ उन्हात बाहेर फिरल्यानंतर डोकं दुखी यांसारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे उन्हातून बाहेर जाताना स्कार्फ किंवा टोपी वापरावी. डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी बाहेर जाताना पाण्याची बाटली घेऊन बाहेर फिरण्यासाठी जावे.