लहान मुलांच्या वाढीसाठी आहार महत्वाचा, मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसताच चालू करा आहार

लहान मुलांच्या विकासासाठी घन अन्न देणे महत्वाचे आहे. हे घन अन्न देण्यास तुम्ही ६ महिन्यानंतर सुरुवात करू शकता. घन स्वरूपात अन्न दिल्याने ते बाळाला पचनास हलके जाईल.

  लहान मुलं जन्माला आल्यानंतर आईच्या दुधावर बाळाची वाढ होते. पाच ते सहा महिन्यांपर्यंत बाळाला कोणतेच घन पदार्थ किंवा पाणी देखील दिले जात नाही. हळूहळू बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होऊ लागते. त्यामुळे त्याला सॉलिड अन्न देणे देखील खूप महत्वाचे आहे. साधारणता वयाच्या ६ महिन्यांनंतर बाळाला पाणी आणि इतर काही सॉलिड पदार्थ खाण्यासाठी दिले जातात. लहान मुलांच्या विकासासाठी घन अन्न देणे महत्वाचे आहे. हे घन अन्न देण्यास तुम्ही ६ महिन्यानंतर सुरुवात करू शकता. घन स्वरूपात अन्न दिल्याने ते बाळाला पचनास हलके जाईल. ६ महिन्यांत बाळ एकदा रांगायला लागले की त्याला घन स्वरूपातील अन्न पदार्थ खाण्यासाठी दिले जातात. पण अनेकदा बाळाची वाढ नीट होत नाही, अशावेळी जर अन्न दिले तर बाळाला लूज मोशनसारख्या इतर कोणत्याही समस्या जाणवू शकतात. त्यामुळे योग्यवेळी अन्न देणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये ‘ही’ काही लक्षणे दिसल्यानंतर तुम्ही त्यांना घन पदार्थ खायला देण्यास सुरुवात करू शकता. चला तर जाणून घेऊया.

  जेव्हा तुमचे बाळ वस्तू चघळते:

  ज्यावेळी तुमचे बाळ त्याच्या तोंडात खेळणी किंवा इतर वस्तू ठेवून ते चघळतो. तेव्हा मुलं अन्न खाण्यासाठी तयार असल्याचे सूचित करू शकता. मुलांना चघळण्यासाठी काकडी, गाजर, सफरचंद किंवा नरम पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता. असे केल्यानंतर मुलांना दात येण्यासाठी मदत होते.

  डोके नियंत्रण:

  काही मुले त्यांचे डोके स्थिर ठेवू शकत नाहीत. जर बाळाचे डोके स्थिर नसेल तर बाळाला गुदमरू शकते. जेव्हा डोके स्थिर असते तेव्हा ते त्यांना अन्न योग्यरित्या गिळण्यास मदत करते.चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात लहान मुलं हळूहळू मन सावरायला शिकते. एकदा लहान मुलांनी मन सावरली की ते पुढे जाऊ लागतात. त्यावेळी तुम्ही त्यांना घन स्वरूपातील अन्न देऊ शकता. फळाचा रस किंवा बीट, गाजरचा रस त्यांना देऊ शकता.

  जेव्हा मुल बसायला शिकते:

  जर तुमचे मुलं ६ महिने पूर्ण होऊनसुद्धा नीट बसत नसेल तर काही दिवस अन्न पदार्थ त्यांना भरवू नये. जेव्हा मुल खुर्चीवर सरळ बसू लागते तेव्हा समजून घ्या की तो घन पदार्थ खाण्यास तयार आहे.एखादा पदार्थ भरवल्यानंतर मुलाची तब्येत बिघडणार नाही याची पूर्ण खात्री करून घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना एखादा पदार्थ भरवतना ते नीट शिजले आणि ताजे अन्न भरवावे.